अंटार्क्टिकातही कोविडचा संसर्ग; वन्यजीवनाला धोका

अंटार्क्टिकातही कोविडचा संसर्ग; वन्यजीवनाला धोका

चिलीच्या बर्नार्डो ओहिगिन्स रिसर्च सेंटरमधील ३६ जणांना डिसेंबरमध्ये कोविडचा प्रादुर्भाव झाला आणि कोरोना विषाणूपासून मुक्त राहिलेला जगातील अखेरचा खंड ह

कोरोना – छोट्या देशांचे मोठे धडे
महाराष्ट्रामध्ये संचारबंदी 
‘जून-जुलैत कोरोना साथीचा उच्चांक’

चिलीच्या बर्नार्डो ओहिगिन्स रिसर्च सेंटरमधील ३६ जणांना डिसेंबरमध्ये कोविडचा प्रादुर्भाव झाला आणि कोरोना विषाणूपासून मुक्त राहिलेला जगातील अखेरचा खंड हा दर्जा अंटार्क्टिका खंडाने गमावला. हे केंद्र अन्य तळांपासून लांब असल्याने साथ आटोक्यात आणणे सोपे आहे असे वाटत आहे पण हा विषाणू किती बेभरवशाचा आणि व्यापक आहे हे आतापर्यंत आपल्याला कळून चुकले आहे. अंटार्क्टिकातील मानवांना याचा फारसा धोका नसला तरी या खंडातील अनन्यसाधारण व आधीपासूनच धोक्यात असलेल्या वन्यप्राण्यांना कोविडची लागण होण्याच्या संभाव्यतेमुळे वैज्ञानिक चिंतेत आहेत. अंटार्क्टिकामधील वन्यप्राण्यांच्या अद्याप कोविडसाठी चाचण्या झालेल्या नाहीत. मात्र, या नाजूक परिसंस्थेत विषाणू कसा शिरू शकतो याचे मूल्यांकन १५ वैज्ञानिकांचे आंतरराष्ट्रीय पथक करत आहे.

प्राणी ते मानव; मानव ते प्राणी

मानवांमध्ये सापडलेल्या सर्व सात कोरोनाविषाणूंचा स्रोत प्राणी हा आहे (त्यांना झूनोसेस असे म्हणतात) आणि त्यांची संसर्गाची क्षमता वेगवेगळी आहे. कोविड-१९ विषाणू प्राण्यामध्ये निर्माण होऊन अज्ञात माध्यमाद्वारे मानवात पसरला असे समजले जाते. २००२-२००४ मध्ये पसरलेला सार्स हा रॅकन डॉग्ज व सिव्हेट्समधून आला होता, असे समजतात. कोरोना विषाणूची सामान्य सार्वत्रिकता आणि जागतिक पर्यावरणाची वेगवान संपृक्तता हे मुद्दे बघता या विषाणूचा संसर्ग मानवापासून प्राण्यांना होण्याची अर्थात “रिव्हर्स झूनोसेस”ची शक्यता वैज्ञानिक तपासून बघत आहेत. प्राण्यांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या जागतिक संघटनाही यावर लक्ष ठेवून आहेत. आत्तापर्यंत सिंह, वाघ, मांजरी, कुत्रे व फेरेट्स या काही प्रजातींनाच कोविडची लागण झाली आहे. मात्र बरे होण्याचे प्रमाण प्रजातींनुसार भिन्न आहे. उदाहरणार्थ, संसर्ग झालेल्या मांजरांमध्ये लक्षणे जाणवली पण त्यांनी विषाणूला लढा दिला. कुत्र्यांमध्ये प्रतिबंधाचे प्रमाण अधिक होते. अंटार्क्टिकामध्ये कुत्रे-मांजरी नसल्या तरी १०० दशलक्षांहून अधिक सी बर्ड्स आहेत, जगातील पेंग्विन्सच्या प्रजातींपैकी ४५ टक्के येथे आहेत, जगातील सील्सपैकी ५० टक्के येथे आहेत. २०२० मध्ये झालेल्या संशोधानुसार सील आणि पक्ष्यांना प्रादुर्भावाचा धोका कमी आहे. संसर्ग झालेल्या लोकांशी थेट संपर्क आला, तरच हा आजार प्राणीमात्रांना होऊ शकतो, असा निष्कर्ष वैज्ञानिकांनी काढला आहे. अंटार्क्टिकामधील अनेक प्राण्यांच्या प्रजाती रिसर्च स्टेशन्सहून जवळ आहेत आणि वन्यजीव अभ्यासामध्ये प्राण्यांशी जवळीक, त्यांना हात लावणे नेहमीच होते. पेंग्विन्सच्या रूस्ट्सना, सीस्लच्या ब्रीडिंगच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असल्याने ही चिंतेची बाब आहे. ऑक्टोबर २०१९ आणि एप्रिल २०२० या काळात ७३,९९१ पर्यटकांनी अंटार्क्टिकाला भेट दिली होती. हे पर्यटक लक्षावधी मायक्रोबायल पॅसेंजर्स सोबत घेऊन जातात आणि ते पॅसेंजर्स तेथेच राहतात. यातील बहुतेक निरुपद्रवी असतात पण केवळ एक शक्तिशाली घटक साथीला कारणीभूत ठरू शकतो हे आपण कोविड साथीच्या निमित्ताने शिकलो आहोत.

पर्यटक नेहमी घेतात ती खबरदारी कोविड प्रतिबंधासाठी पुरेशी नाही. सर्वप्रथम संशोधन केंद्रातील मानवांकडून मानवांना होणारा संसर्ग नियंत्रित झाला पाहिजे. यासाठी अंटार्क्टिकाला जाणाऱ्यांनी चाचणी व विलगीकरणाचे नियम पाळले पाहिजेत. दुसरा मुद्दा म्हणजे वन्यप्राण्यांशी जवळून संबंध ठेवण्याबाबत निर्बंध आवश्यक आहे. वैज्ञानिकांनी संरक्षण उपकरणे वापरली पाहिजेत. ऑस्ट्रेलियातील वन्यप्राण्यांसोबत काम करणाऱ्यांनीही याच निर्बंधांचे पालन केले पाहिजे.

जगाच्या अन्य भागांतून कोरोनाचा संसर्ग झालेले स्थलांतरित प्राणीही अंटार्क्टिका खंडात कोविडची साथ पसरवू शकतात. उदाहरणार्थ, स्कुआज कोविडचा प्रचंड उद्रेक झालेल्या दक्षिण अमेरिकन किनारपट्टीवरून अंटार्क्टिकावर जातात.

याशिवाय सुमारे ३७ टक्के तळांवरून कोणतेही उपचार न केलेले सांडपाणी अंटार्क्टिकाच्या परिसंस्थेत सोडले जाते. त्यातूनही प्रादुर्भावाची शक्यता वाढते. पाण्यामार्फत विषाणूचे संक्रमण होत नाही असे समजले जात असले, तरीही या सांडपाण्यात काही अत्यंत धोकादायक प्रदूषक आढळले आहेत.

अंटार्क्टिकामध्ये वन्यप्राण्यांना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी खबरदारी घेणे आता अत्यावश्यक झाले आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0