आमदाराच्या मुलाला समज देणाऱ्या महिला पोलिसाची बदली

आमदाराच्या मुलाला समज देणाऱ्या महिला पोलिसाची बदली

सूरतः गुजरातचे आरोग्यमंत्री कुमान कानाणी यांचा मुलगा व त्याच्या काही मित्रांनी लॉकडाऊन व संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांना समज देणार्या सुनीत

मानवी मनाचे रेखाटन
कपिल सिब्बल यांना खासदारकीसाठी सपाकडून पाठिंबा
फडणवीसांची बखर – १ : भाजप नेतृत्वाचा प्रवास

सूरतः गुजरातचे आरोग्यमंत्री कुमान कानाणी यांचा मुलगा व त्याच्या काही मित्रांनी लॉकडाऊन व संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांना समज देणार्या सुनीता यादव या महिला पोलिस कर्मचार्याची बदली करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कानाणी यांचा मुलगा प्रकाश व अन्य दोघांना अटक केली पण त्यांची नंतर जामीनावर सुटका झाली.

९ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कुमान कानाणी यांचा मुलगा प्रकाश (३७) व त्याच्या काही मित्रांनी संचारबंदी मोडली. प्रकाश यांचे मित्र चेहर्यावर मास्क न लावता कारमधून फिरायला बाहेर पडले असताना त्यांना ड्युटीवर असलेल्या सुनीता यादव यांनी रोखले. त्यांनी या मुलांच्या कारची किल्ली काढून घेतली. त्यावर या मित्रांनी प्रकाश यांना घटनास्थळी बोलावले व यानंतर प्रकरण वाढत गेले.

सुनीता यादव यांनी या सर्वांना कायदा समजावण्याचा प्रयत्न केला. पण हे तरुण ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. या संदर्भातील व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर रविवारी १२ जुलैला सुनीता यादव यांना सूरत पोलिस मुख्यालयात बोलावण्यात आले व नंतर त्या सुटीवर गेल्या.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सुनीता यादव यांची वराछा या पोलिस ठाण्यातून पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली असून या घटनेची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

या व्हीडिओतला तरुण, त्याच्या ओळखी खूप वर असल्याचे सांगत सुनीता यादव यांना ३६५ दिवस तेथेच उभे राहायला लावू शकतो, अशी धमकी देताना दिसतो. यावर ३६५ दिवस एकाच जागी तैनात राहायला मी काय दासी किंवा तुमच्या वडिलांची सेवक आहे का, असा सवाल सुनीता त्या तरुणाला खडसावून विचारतात.

हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर महिला पोलिसाच्या वर्तनाचे मोठ्या प्रमाणात कौतुक दिसून आले. मंत्र्याचा मुलगा असूनही न घाबरता आपल्या कर्तव्याला सुनीता यादव जागल्या अशा प्रतिक्रिया उमटत होत्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0