बलात्काराच्या गुन्ह्यांत २० टक्क्याने वाढ, सर्वाधिक बलात्कार राजस्थानमध्ये

बलात्काराच्या गुन्ह्यांत २० टक्क्याने वाढ, सर्वाधिक बलात्कार राजस्थानमध्ये

नवी दिल्लीः २०२१ या वर्षांत देशात महिलांवरील बलात्काराच्या ३१,६७७ गुन्ह्यांची नोंद झाली असून राजस्थानमध्ये सर्वाधिक बलात्काराची नोंद झाल्याची माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरो (एनसीआरबी)ने दिली आहे. एनसीआरबीच्या मते देशात रोज बलात्काराचे ८७ गुन्हे नोंद होतात तर २०२० या वर्षाच्या तुलनेत २०२१मध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये १९.३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राजस्थानमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद असून त्या खालोखाल मध्य प्रदेश व उ. प्रदेश ही राज्ये येतात.

एनसीआरबीने महिला अत्याचाराची आकडेवारीही जारी केली आहे. त्यानुसार देशात महिलांवर अत्याचाराच्या गुन्ह्यांची संख्या ४ लाख २८ हजार २७८ इतकी असून २०२०च्या तुलनेत २०२१ मध्ये महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांत १३.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महिला अत्याचार या वर्गवारीत बलात्कार, छळवणूक, अॅसिड हल्ले, नवरा वा सासरच्या व्यक्तिंकडून शारीरिक मारहाण, घरगुती हिंसाचार आदींचा समावेश होतो.

राजस्थानमध्ये सर्वाधिक बलात्काराचे गुन्हे

२०२०च्या तुलनेत २०२१मध्ये राजस्थानमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांच्या नोंदीत १९ टक्के वाढ झाली असून २०२१मध्ये एकट्या राजस्थानमध्ये ६,३३७ बलात्काराचे गुन्हे नोंद झाले आहेत. त्या खालोखाल म. प्रदेशात २,९४७, उ. प्रदेशात २,८४५, महाराष्ट्रात २,५०६ आदी राज्ये आहेत.

नागालँडमध्ये २०२१ मध्ये बलात्काराचे ४ गुन्हे नोंद झाले आहेत, त्या खालोखाल सिक्कीममध्ये ८, आसाममध्ये १,८३५ बलात्काराचे गुन्हे नोंदले गेले आहेत.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार भारतातील ९६.५ टक्के बलात्काराच्या गुन्ह्यांमधील ८९ टक्के बलात्कार हे संबंधित पीडित महिलेचे मित्र (ऑनलाइन मित्र), लिव्ह इन संबंधातील सहकारी, विभक्त नवरे वा कौटुंबिक मित्र, नोकरीतील सहकारी वा ओळखीची व्यक्ती यांच्याकडून होतात.

महानगरात दिल्लीमध्ये महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार देशातील १९ महानगरांपैकी राजधानी नवी दिल्लीत २०२१ या सालात १,२२६ बलात्काराचे गुन्हे नोंद झाले आहेत. त्या खालोखाल जयपूरमध्ये ५०२, मुंबई ३६४, कोलकाता ११, कोईम्बतूर १२, पटना ३० अशी गुन्हे नोंद आहे. तर बलात्काराच्या सर्वाधिक कमी गुन्ह्यांची नोंद कोलकातामध्ये ०.२, चेन्नईमध्ये १.०, कोईम्बतूरमध्ये १.१ इतकी असून जयपूरमध्ये सर्वाधिक बलात्कार ३४.५, दिल्लीत १६.१, इंदोरमध्ये १५.९ इतके नोंदले गेले आहेत.

महानगरातील महिला अत्याचाराची सर्वाधिक प्रकरणांची टक्केवारी दिल्लीत ३२.२० टक्के, मुंबईत १२.७६ व बंगळुरूत ७.२ टक्के इतकी नोंदली गेली आहे.

उ. प्रदेशात महिला अत्याचाराची संख्या सर्वाधिक

देशात एकूण महिला अत्याचाराच्या सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद उ. प्रदेशात असून येथे २०२१मध्ये ५६,०८३ गुन्हे नोंदले गेले आहेत. त्या खालोखाल राजस्थानमध्ये ४०,७३८, महाराष्ट्रात ३९,५२६, प. बंगालमध्ये ३५,८८४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

मूळ बातमी

COMMENTS