आर्थिक विकासदर ८.३ टक्केः वर्ल्ड बँकेचा अंदाज

आर्थिक विकासदर ८.३ टक्केः वर्ल्ड बँकेचा अंदाज

वॉशिंग्टनः या आर्थिक वर्षांत भारताचा विकासदर ८.३ टक्के इतका राहील, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. गेल्या एप्रिलमध्ये जागतिक बँकेने भारताचा आर्थि

‘तुम्ही काही बोलाल, ही अपेक्षा आहे’
मुंबईबाग आंदोलन मोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न
येडियुरप्पा सरकार विधानसभेत उत्तीर्ण

वॉशिंग्टनः या आर्थिक वर्षांत भारताचा विकासदर ८.३ टक्के इतका राहील, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. गेल्या एप्रिलमध्ये जागतिक बँकेने भारताचा आर्थिक विकासदर १०.१ टक्के इतका राहील असा अंदाज वर्तवला होता पण आपले हे भाकीत जागतिक बँकेने बदलले आहे.

२०२२-२३ या आर्थिक वर्षात आर्थिक विकासदर ७.५ टक्के इतका राहील असेही जागतिक बँकेने म्हटले आहे.

भारतात कोरोनाची आलेली दुसरी लाट भयावह असल्याने देशभर पुन्हा लॉकडाऊन पुकारावा लागला, त्याचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसल्याचे जागतिक बँकेचे मत आहे.

पण आता कोविडची लाट ओसरल्यानंतर पायाभूत क्षेत्र, ग्रामीण विकास व आरोग्यावर सरकारने भर दिल्यास आर्थिक विकासदर अधिक वेगाने वाढू शकतो असेही जागतिक बँकेने म्हटले आहे.

जागतिक बँकेने जगाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ५.६ टक्के इतका राहील असे मत व्यक्त करत गेल्या ८० वर्षानंतरचा तो सर्वाधिक आर्थिक विकासदर असेल असे म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0