कोरोनाचा नवा विषाणू युरोपात पोहोचला

कोरोनाचा नवा विषाणू युरोपात पोहोचला

ब्रिटनमध्ये ज्या नव्या कोरोना विषाणूचा प्रकार आढळला होता तो संक्रमक विषाणू आता युरोपातील अनेक देशांमध्ये आढळल्याचे तेथील सरकारांनी मान्य केले आहे.

मुंबईत कोरोनाचे दोन संशयित, चीनमध्ये २६ मृत्यू
मद्याच्या ऑनलाइन विक्रीस परवानगी घातक!
दिल्लीत गोंधळ राज्यातही गोंधळ…

ब्रिटनमध्ये ज्या नव्या कोरोना विषाणूचा प्रकार आढळला होता तो संक्रमक विषाणू आता युरोपातील अनेक देशांमध्ये आढळल्याचे तेथील सरकारांनी मान्य केले आहे.

ब्रिटनमधून स्पेन, स्वीडन व स्वित्झर्लंडमध्ये परतलेल्या काही प्रवाशांमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रकार सापडल्याची पुष्टी झालेली आहे. गेल्याच आठवड्यात ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू प्रकार सापडल्याचे लक्षात आल्यानंतर युरोपमधील अनेक देशांनी ब्रिटनशी सुरू असलेली आपली हवाई सेवा स्थगित केली होती.

गेल्या गुरुवारी ब्रिटनमधून स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये पोहोचलेल्या एका व्यक्तीच्या तीन नातलगांना कोरोनाच्या नव्या विषाणूची बाधा झाल्याचे आढळून आले होते.

तर गेल्या शनिवारी फ्रान्सने ब्रिटनहून आलेल्या एका प्रवाशाला नव्या कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे जाहीर केले होते. फ्रान्सने या घटनेनंतर फ्रान्सला लागून असलेल्या आपल्या सीमा बंद केल्या आहेत पण फ्रान्सने युरोपीय संघाच्या सीमा बंद केलेल्या नाहीत. प्रवाशांनी आपले कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवल्यास त्यांना फ्रान्समध्ये प्रवेश दिला जात आहे.

स्वित्झर्लंडमध्येही तीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. या तिघांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यात दोन ब्रिटनचे नागरिक असून ते ख्रिसमसच्या सुट्यांसाठी तेथे आले आहेत. मात्र स्वित्झर्लंडने ख्रिसमससाठी आपल्या सीमा सर्व देशांच्या नागरिकांसाठी खुल्या ठेवल्या आहेत. त्यात ब्रिटिश पर्यटकांचा सहभाग अधिक आहे.

डेन्मार्क, जर्मनी, इटाली, नेदरलँड व ऑस्ट्रेलियामध्ये नव्या कोरोना विषाणूचा प्रकार आढळला आहे.

जपानमध्ये ब्रिटनमधून आलेल्या ५ जपानी नागरिकांना नव्या कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0