येडियुरप्पा सरकार विधानसभेत उत्तीर्ण

येडियुरप्पा सरकार विधानसभेत उत्तीर्ण

बंगळुरू : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सोमवारी कर्नाटक विधानसभेत आवाजी मतदाने बहुमत मिळवले. भाजपकडे सरकार स्थापन करण्याइतके पर्याप्त सद

एक्झिट पोल ठरले फोल!
धनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस
उ. प्रदेशात कोणत्याही पक्षाशी युती नाहीः मायावती

बंगळुरू : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सोमवारी कर्नाटक विधानसभेत आवाजी मतदाने बहुमत मिळवले. भाजपकडे सरकार स्थापन करण्याइतके पर्याप्त सदस्य संख्या असल्याने काँग्रेस व जेडीएसने विश्वासदर्शक ठरावाचा आग्रह धरला नाही. त्यामुळे हे मतदान आवाजी घेण्यात आले.

बहुमत मिळवल्यानंतर येडियुरप्पा यांनी आपल्यावर विधानसभेचा विश्वास असल्याचे मत व्यक्त केले. गेल्या वर्षी तीन दिवसांचे सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आले होते पण त्या सरकारला बहुमत सिद्ध करता आले नव्हते. आता कर्नाटकाच्या विकासासाठी आपले सरकार कटिबद्ध राहील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या कठीण राजकीय परिस्थितीत आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आल्याचे सांगून येडियुरप्पा म्हणाले, माझे सरकार सुडाचे राजकारण करणार नाही. पण राज्याची बिघडलेली प्रशासकीय व्यवस्था रुळावर आणण्याचे माझे प्रयत्न असतील. यासाठी विरोधी पक्षांनी मदत करावी अशी विनंती त्यांनी केली.

येडियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, येडियुरप्पा यांच्याकडे फक्त १०५ आमदार असल्याने हे आपल्याकडे बहुमत असल्याचे कसे सांगू शकतात, भाजपच्या सरकारकडे जनादेशही नाही. हे सरकार किती दिवस चालते हे पाहायचे आहे. माझी इच्छा आहे की येडियुरप्पा यांनी पूर्ण काळ सरकार चालवावे पण तशी परिस्थिती दिसत नाही.

येडियुरप्पा यांच्या बहुमताच्या दाव्यावर माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीही टीका केली. माझ्या कारकिर्दीत  राज्याची प्रशासनव्यवस्था घसरल्याचा येडियुरप्पा यांचा दावा मला मान्य नाही. तुम्ही कटकारस्थान करून सत्ता मिळवली असताना प्रशासन रुळावरून घसरले असा कसा आरोप करू शकता, असा सवाल त्यांनी केला.

विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा

येडियुरप्पा यांनी बहुमत मिळवल्यानंतर काही मिनिटांतच विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण या पदापासून विलग व्हायचे ठरवले असल्याने राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपल्या १४ महिन्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत राज्यघटनेला बांधील राहून विवेकपूर्ण काम केल्याचा दावा रमेशकुमार यांनी केला.

केआर रमेशकुमार यांनी आपल्या राजीनामा देण्याअगोदर काँग्रेस व जेडीएसच्या १७ बंडखोर आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याच्या हालचाली भाजपच्या गोटातून सुरू झाल्या होत्या. हा ठराव येण्याअगोदरच रमेशकुमार यांनी राजीनामा दिला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1