मथुरेत मांस व दारुविक्रीवर बंदी

मथुरेत मांस व दारुविक्रीवर बंदी

मथुराः शहरातील वृंदावन, गोवर्धन, नंदगांव, बरसाना, गोकुल, महावन ऊर्फ बलदेव या भागांमध्ये लवकरच मांस व दारुच्या विक्रीला बंदी घालण्यात येईल, अशी घोषणा उ

नेहरु, अटल देशाचे आदर्श नेतेः गडकरी
पोलिस धमकावणीनंतर सरकारची ट्विटरला समज
भाजपच्या एकाच म्यानात दोन तलवारी

मथुराः शहरातील वृंदावन, गोवर्धन, नंदगांव, बरसाना, गोकुल, महावन ऊर्फ बलदेव या भागांमध्ये लवकरच मांस व दारुच्या विक्रीला बंदी घालण्यात येईल, अशी घोषणा उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी सोमवारी केली. मांस व दारुच्या व्यवसायात असणार्यांना अन्य व्यवसाय देण्यात येईल व त्यांचे नव्याने पुनवर्सन करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सोमवारी आदित्यनाथ मथुरेच्या दौर्यावर आले होते व शहरातील रामलीला मैदानावर त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी घोषणा केली.

२०१७पासून या परिसरातील जनतेची दारु व मांस विक्रीवर बंदी आणावी अशी मागणी होती. त्यानंतर सरकारने मथुरा व वृंदावन नगर या नगरपालिका एकत्रित करून त्यांची महानगर पालिका केली. त्यानंतर या स्थानाला ७ पवित्र धार्मिक स्थळांच्या यादीत स्थान देण्यात आले होते. त्यानंतर जनतेच्या मागणीचा विचार करून दारु व मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला, असे आदित्य नाथ यांनी स्पष्ट केले.

दारु व मांस विक्री व्यवसायात असलेल्यांना दुग्धपालन व्यवसायांतर्गत दुग्धविक्रीचे छोटे स्टॉल काढून देण्यात येतील, अन्य व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याबरोबर पुनर्वसन करण्यात येईल. कोणाचीही रोजी रोटी काढून घेण्याचा सरकारचा हेतू नाही. प्रत्येकाचे योग्य रितीने पुनर्वसन करण्यात येईल. मथुरा पवित्र धार्मिक स्थळ असल्याने त्याच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल, असे आदित्यनाथ म्हणाले.

आता मोदींच्या नेतृत्वाखाली देश नव्या वाटेवर चालत असून देशात वेगाने परिवर्तन होत आहे. यापूर्वी लोक मंदिरात जाण्यास संकोच करत होते. आता लोक राम आमचा आहे, कृष्ण आमचा आहे असे म्हणत आहेत. हे परिवर्तन आहे असा दावाही त्यांनी केला.

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी राम लल्लाचे दर्शन घेतले आहे. पूर्वी सरकारला असे दर्शन घेणे भीतीदायक वाटत होते. आपल्यावर धर्माचे लेबल लागेल असे वाटत होते. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. भारताच्या अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसाचे प्रतीक म्हणून या सर्व देवांची पूजा आता होऊ लागली आहे. पूर्वी अशा हिंदू सण-उत्सवाच्या शुभेच्छा कोणी राजकीय नेता, मंत्री देत नसे. भाजपचे लोकप्रतिनिधी शुभेच्छा देत असतं, असेही आदित्य नाथ म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0