उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये सोमवारी रात्री दोन साधूंची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणात मुरारी उर्फ राजू नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक के
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये सोमवारी रात्री दोन साधूंची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणात मुरारी उर्फ राजू नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन साधू एका मंदिरात राहात होते व मंदिरात त्यांची धारदार हत्याराने हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही हत्या कोणत्याही धार्मिक वादातून झालेली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या दोन साधूंच्या या हत्येनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्यनाथ यांना दूरध्वनी करून झालेल्या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही तुमच्यासोबत आहोत, असेही ते म्हणाले. नंतर ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांनी, अशा घटनेचे राजकारण करू नये, त्याला धार्मिक रंग देऊ नये, आम्ही जशी आरोपींवर कठोर कारवाई केली तशीच कारवाई तुम्हीही करावी असे म्हटले आहे.
नेमकी घटना काय घडली?
या घटनेसंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकारी संतोष कुमार सिंह यांनी एएनआय न्यूज एजन्सीला सांगितले की, दोन साधू मंदिरात राहायचे आणि या साधुंचा चिमटा मुरारी ऊर्फ राजू या व्यक्तीने उचलला. आपला चिमटा परत मिळावा म्हणून या दोन साधूंचे राजूशी भांडण झाले व या भांडणात दोन साधूंची राजूने हत्या केली. राजूने दोन साधूंवर हल्ला केला तेव्हा तो नशेत होता. त्याने भांग घेतली होती, त्या नशेत त्याचे साधूंशी भांडण होऊन त्याच्याकडून दोघांची हत्या झाली असे पोलिसांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात पालघरमध्ये दोन साधूंना जमावाने मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून ठार मारले होते. त्या घटनेला धार्मिक रंग देण्यात आला होता. भाजपने या घटनेची चौकशी करावी अशई मागणी केली होती. तर रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी पालघर घटनेवरून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लक्ष्य केले होते.
COMMENTS