अयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू

अयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू

लखनौः ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मंगळवारी अयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीच्या कामाची सुरूवात झाली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. २०१९मध्ये

बाबरी मशिदीत राममूर्ती कशी आली : एकाने सांगितलेली कथा
रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याची सुनावणी पूर्ण
‘राम मंदिर आंदोलन स्वातंत्र्य आंदोलनापेक्षा मोठे’

लखनौः ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मंगळवारी अयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीच्या कामाची सुरूवात झाली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

२०१९मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा तोडगा म्हणून अयोध्येत राम मंदिर व बाबरी मशीद उभी करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार अयोध्येपासून २५ किमी अंतरावर धन्नीपूर या गावांत ५ एकर जमिनीवर इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून मशीद बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंगळवारी सकाळी सव्वा आठ वाजता मशिदीच्या बांधकामास औपचारिक सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पावणे नऊ वाजता तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. ट्रस्टचे प्रमुख जफर अहमद फारुकी यांनी १२ सदस्यांच्या उपस्थितीत तिरंगा फडकावला नंतर वृक्षारोपण करण्यात आले. सध्या या जागेची मृदा तपासणी सुरू असून नकाशा आल्यानंतर वेगाने काम सुरू होईल असे फारुकी यांनी सांगितले. या मशिदीच्या निर्मितीसाठी देणग्यांचेही आवाहन करण्यात आले आहे.

मूळ बातमी

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0