आरे मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरूच राहणार

आरे मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरूच राहणार

नवी दिल्ली : मुंबईतील आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडचे बांधकाम थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला पण ज्या भागातल्या झाडांची कत्तल केली गेल

मेट्रो चाचणी आरेच्या हद्दीबाहेर होणार
‘आरे वाचले’; मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे होणार
#SaveAareyforest संतप्त झाला सोशल मीडिया

नवी दिल्ली : मुंबईतील आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडचे बांधकाम थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला पण ज्या भागातल्या झाडांची कत्तल केली गेली त्याबदल्यात किती झाडे लावली व त्यातील किती झाडे जगली याची माहिती व छायाचित्रे सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने एमएमआरसीएलला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने आरे बचाव आंदोलनाला धक्का बसला आहे. या निकालाने आरेतील मेट्रो कारशेडचे बांधकाम सुरूच राहणार आहे व त्याला लवकरच गती मिळेल अशा हालचाली सरकारकडून सुरू झाल्या आहेत.

या निर्णयाबरोबर सर्वोच्च न्यायालयाने आरेतील वृक्षतोडीवर मात्र स्थगिती कायम ठेवली आहे. त्यावर सरकारतर्फे युक्तिवाद करणारे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी आरेमध्ये सध्या कोणतीही झाडे कापण्यात आली नसल्याचा खुलासा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अमलबजावणी राज्य सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0