बिहारः एनडीए-महागठबंधनमध्ये चुरस

बिहारः एनडीए-महागठबंधनमध्ये चुरस

नवी दिल्लीः २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीए व महागठबंधनमध्ये चुरस निर्माण झाली आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत एनडीए १३१ जागांवर तर महागठ

बिहारः एनडीएचा पूर्ण बहुमत मिळाल्याचा दावा
माझी अखेरची निवडणूकः नितीश कुमार
कपिल सिब्बल यांच्यावर काँग्रेस नेत्यांचा निशाणा

नवी दिल्लीः २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीए व महागठबंधनमध्ये चुरस निर्माण झाली आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत एनडीए १३१ जागांवर तर महागठबंधन आघाडी १०३ जागांवर पुढे होते. पण हा आकडा पुढे बदलूही शकतो कारण आतापर्यंत ११ टक्के मतांची मोजणी झाली असून अद्याप चार कोटी मतांची मोजणी बाकी असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. त्यात ६० जागा अशा आहेत की जेथे मतांचा फरक १ हजाराहून कमी आहे. त्यामुळे बिहार विधानसभेचे स्पष्ट चित्र हाती यायला रात्र लागेल असे आयोगाने म्हटले आहे. बिहारमध्ये बहुमताचा आकडा १२२ इतका आहे.

या निवडणुकांत आयोगाने ६३ टक्के अधिक इव्हीएमचा वापर केला आहे. राज्यात सुमारे सव्वा चार कोटी मतदान झाले असून एक वाजेपर्यंत १ कोटी मतदान मोजले गेले होते. कोविडमुळे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. २०१५च्या विधानसभा निवडणुकांत ६५ हजार मतदान केंद्रे होती ती यंदा १ लाख ६ हजार इतकी वाढवण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

भाजपची आघाडी, जेडीयू पिछाडीवर

मंगळवार सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत एनडीएने १३१ जागांवर आघाडी घेतली होती. यात भाजप ७७ तर जेडीयू ५१ जागांवर होते. तर महागठबंधन आघाडीतील राजदने ६५ तर काँग्रेसने २० जागांवर आघाडी घेतली होती. लोक जनशक्ती पार्टीने जेडीयूला धक्का दिल्याचे दिसत होते.

पहिल्या काही फेर्यांचे विश्लेषण पाहता जेडीयूची कमालीची पिछेहाट तर भाजपची सरशी दिसून आली. नितीश कुमार यांच्याविरोधात लाट असल्याचे काही फेर्यांमधून दिसून आले. पण हे चित्र पालटण्याचीही शक्यता आहे. दुसरीकडे महागठबंधन आघाडीतील डाव्या पक्षांपैकी भाकपा-मालेने १३ जागा तर भाकपाने ३ जागांवर आघाडी घेतली आहे. डाव्या पक्षांची ही आघाडी आश्चर्यकारक आहे.

दरम्यान मतमोजणी सुरू असताना सकाळीच जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ता के.सी. त्यागी यांनी तेजस्वी यांच्यामुळे नव्हे तर कोविड-१९मुळे एनडीएला पराभव पत्करावा लागला असे विधान केले होते. नंतर एनडीएची आघाडी दिसताच पटण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: