२२ हजार भारतीयांचे अमेरिकेकडे शरणागतीचे अर्ज

२२ हजार भारतीयांचे अमेरिकेकडे शरणागतीचे अर्ज

वॉशिंग्टन : २०१४ पासून आजपर्यंत अमेरिकेत शरण मागणाऱ्या भारतीयांची संख्या २२ हजाराहून अधिक असून भारतातील बेरोजगारी व असहिष्णुता ही दोन कारणे अमेरिकेत श

ट्रम्प यांचा दौरा आटोपला, सीएएवर भाष्य नाही
रिप्लेसमेंट सिद्धांत आणि जगभरचे जेंड्रन
भौगोलिक निर्देशकांचा गुंता : भाग ४

वॉशिंग्टन : २०१४ पासून आजपर्यंत अमेरिकेत शरण मागणाऱ्या भारतीयांची संख्या २२ हजाराहून अधिक असून भारतातील बेरोजगारी व असहिष्णुता ही दोन कारणे अमेरिकेत शरणागती मागण्यामागील असल्याची माहिती पुढे आली आहे.

‘यूएस सिटिझनशीप अँड इमिग्रेशन सर्विसेस नॅशनल रेकॉर्डस सेंटर’ने ही माहिती अमेरिकेतील ‘नॉर्थ अमेरिकन पंजाबी असो.’ या संस्थेला माहिती अधिकारात दिली आहे. २०१४ पासून आजपर्यंत अमेरिकेत शरण मागणाऱ्या भारतीयांची संख्या २२,३७१ इतकी असल्याचे अमेरिकेचे म्हणणे असून त्यात १५,४३६ पुरुष व ६,९३५ महिला आहेत. बहुतांश भारतीय अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी अवैध मार्गाचा वापर करत असल्याचेही दिसून आल्याचे एनएपीएचे कार्यकारी संचालक सतनाम चिंह चहल यांनी सांगितले. सतनाम सिंह चहल हे अमेरिकेत शरण मागणाऱ्या भारतीयांच्या मदतीसाठी काम करतात.

चहल यांच्या मते अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर बहुतांश भारतीय तेथील वकिलांची मदत घेतात. पण या वकिलांची फी महागडी असल्याने ती या भारतीयांच्या उत्पन्नापेक्षा अधिक असते. काही भारतीयांना ही फी परवडते पण त्यानंतरचा कायदेशीर प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व तणावपूर्ण असते. काही वेळा अर्ज देऊनही अनेक महिने अमेरिकेत राहण्याचा परवानाही मिळत नाही. त्यामुळे अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज कायदेशीर प्रक्रियेतून आला तरच शक्य होते, असे चहल यांचे म्हणणे आहे.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात ३११ भारतीयांनी मेक्सिकोतून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केला पण या नागरिकांकडे मेक्सिकोत येण्याचे कारण नसल्याने मेक्सिको सरकारने या नागरिकांची भारतात रवानगी केली.

२०१७मध्ये ट्रम्प प्रशासन सत्तेत आल्यानंतर इमिग्रेशन खात्याकडे ५ लाख ४२ हजार ४११ खटले प्रलंबित होते. ही संख्या आता २०१९ अखेर १० लाख २३ हजार ७६७ इतकी झाली आहे.

गेल्या काही वर्षांत भारतातील श्रीमंतांमध्ये आपला देश सोडणाऱ्यांची संख्या वाढत असून असे करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक तिसरा आहे. गेल्या वर्षी ५ हजार श्रीमंत कोट्यवधींनी भारत सोडला होता.  न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार २०१७ मध्ये ७ हजार कोट्यधीशांनी तर २०१६ मध्ये ६ हजार तर २०१५मध्ये ४ हजार कोट्यधीशांनी भारत सोडला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: