२२ व्या दिवशीही इंधन दरवाढ

२२ व्या दिवशीही इंधन दरवाढ

नवी दिल्लीः पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत सोमवारी सलग २२ व्या दिवशीही वाढ झाली असून पेट्रोलच्या प्रती लीटर दरात ५ पैसे तर डिझेलच्या प्रती लीटर दरात १३ प

केरळ सरकारवरील अविश्वास ठराव फेटाळला
दिल्ली निवडणुका – विकास विरुद्ध विभाजन
द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा की ममता विरुद्ध सोनिया?

नवी दिल्लीः पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत सोमवारी सलग २२ व्या दिवशीही वाढ झाली असून पेट्रोलच्या प्रती लीटर दरात ५ पैसे तर डिझेलच्या प्रती लीटर दरात १३ पैशांनी वाढ झाली. या वाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे प्रती लीटर दर ८७.१९ रु. तर डिझेलचे दर प्रती लीटर ७८.८३ रु. इतके झाले आहेत.

या इंधन दरवाढीच्या विरोधात सोमवारी काँग्रेसने देशभर आंदोलने करत सरकारच्या नफेखोरीवर टीका केली.

गेल्या २२ दिवसांत ही दरवाढ पेट्रोलमध्ये प्रती लीटर ९.१७ पैसे तर डिझेलमध्ये प्रती लीटर ११.१४ रु. इतकी झाली आहे.

प्रत्येक राज्यात इंधनावर व्हॅट असल्याने त्याचे दर वेगवेगळे आहेत. पण देशात सर्वसाधारण पेट्रोलने प्रती लीटर ८०-८७ रु.चा तर डिझेलने ७५- ८० रु. प्रती लीटर इतका पल्ला गाठला आहे.

पेट्रोलच्या एक लीटर दरातले ३२.९८ रु. तर डिझेलच्या प्रती लीटर दरातले ३१.८३ रु. केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणून घेतले जातात.

सोनियांचा पुन्हा सरकारवर हल्ला

सोमवारी पुन्हा इंधन दर वाढवल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत संकटाच्या काळात सरकारने नफेखोरी करू नये, असे सुनावले. सध्याचा काळ संकटाचा आहे, अशा काळात लोकांच्या मदतीला सरकारने असायला पाहिजे पण सरकार उलट नफेखोरी करत असून गेल्या ३ महिन्यात २२ वेळा सरकारने इंधन दरवाढ केली आहे. २०१४ पासून आंतरराष्ट्रीय तेलबाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असतानाही सरकारने देशात इंधन दर कमी केलेले नाहीत. या काळात केंद्र सरकारने १२ वेळा केंद्रीय अबकारी कर वाढवत १८ लाख कोटी रु.हून अधिक महसूल जमा केला आहे. जनतेच्या मेहनतीचा हा पैसा आहे पण सरकार त्यांच्यावर हा पैसा खर्च न करता स्वतःची तिजोरी भरत असल्याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली.

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, इंधन वाढीचा फटका थेट शेतकरी, नोकरदार, मध्यमवर्ग व छोट्या उद्योगधंद्यांना बसला असून ही दरवाढ सरकारने लवकरात लवकर मागे घ्यावी, अशी पुन्हा विनंती आहे. मार्चमध्ये जो अबकारी कर वाढवला होता तोही मागे घेतला जावा, असेही त्या म्हणाल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0