इंटरनेटअभावी ४० कोटी मुले शिक्षणापासून वंचित

इंटरनेटअभावी ४० कोटी मुले शिक्षणापासून वंचित

नवी दिल्लीः कोरोना महासाथीमुळे जगभर ऑनलाइन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात जोर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण इंटरनेट नसल्याने सुमारे ४० कोटी मुले शिक्षणापा

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये
‘माझी वसुंधरा’ अभ्यासक्रम शालेय शिक्षण खात्याकडे सुपूर्द
जेएनयू विद्यार्थ्यांचं आंदोलन

नवी दिल्लीः कोरोना महासाथीमुळे जगभर ऑनलाइन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात जोर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण इंटरनेट नसल्याने सुमारे ४० कोटी मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचा धक्कादायक अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

बुधवारी ‘कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन’ या संस्थेतर्फे ‘लॉरियेट्स अँड लीडर्स फॉर चिल्‍ड्रेन समिट’ ही दोन दिवसांची डिजीटल शिखर परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत ‘फेअर शेअर फॉर चिल्‍ड्रेन- प्रिव्हेंटिंग द लॉस ऑफ ए जनरेशन टू कोविड-19’ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार जगभरात इंटरनेटअभावी ४० कोटीहून अधिक मुले ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कोविडच्या संकटावर मात करण्यासाठी ‘जी-२०’ संघटनेने ८.०२ हजार अब्ज डॉलर मदत देण्याची घोषणा केली आहे पण त्या मदतीपैकी केवळ ०.१३ टक्के म्हणजे १०.२ अब्ज डॉलरच मदत मिळाली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रावरही मदतीअभावी परिणाम झाला आहे. या अहवालात जगभरात शाळा बंद असल्याने एक अब्जहून अधिक मुले शिक्षणापासून वंचित झाली असून घरात इंटरनेटची सोय नसल्याने ४० कोटीहून अधिक मुलांना शिकण्यास अडचणी येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या अहवालात शाळा बंद असल्याने ३४ कोटी ७० लाख मुलांना पोषण आहारही मिळाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या ६ महिन्यात ५ वर्षांहून कमी वयाची १० लाख २० हजाराहून अधिक मुले कुपोषणाचे बळी ठरण्याची भीती असून लशीकरण मोहिमांवरही कोरोना महासाथीचा परिणाम झाल्याने एक वर्षांहून कमी वयाच्या ८ कोटी मुलांना आजार उद्भवू शकतात अशी भीती व्यक्त केली गेली आहे.

शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी या अहवालासंदर्भात आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, गेल्या दोन दशकानंतर पहिल्यांदा मुलांची सर्वाधिक संख्या बालश्रम, गरीबी व शाळांपासून वंचित होत असल्याचे दिसत आहे. कोरोना महासंकटाचा सामना करण्यासाठी श्रीमंत देशांनी मदतीचे आश्वासन दिले होते पण ही मदत अद्याप मिळत नसल्याने हे गंभीर प्रश्न जगापुढे उभे राहताना दिसत आहेत.

सत्यार्थी असेही म्हणाले की, जगातील श्रीमंत देश स्वतःपुढे आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च करत आहेत पण समाजातील सर्वाधिक कमजोर व असहाय्य अशा मुलांसाठी ते मदत करताना पुढे येताना दिसत नाहीत. या देशांची निष्क्रियता चिंता वाढवणारी आहे, असे सत्यार्थी म्हणाले.

कैलास सत्यार्थी ‘लॉरियेट्स अँड लीडर्स फॉर चिल्‍ड्रेन समिट’ या संस्थेचे संस्थापक आहेत.

गेल्या ऑगस्ट महिन्यात एनसीईआरटीने एक अहवाल प्रसिद्ध केला होता, या अहवालात भारतात केंद्रीय विद्यालयांमध्ये शिक्षण घेणार्या २७ टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाइल फोन व लॅपटॉपसारख्या सोयी नाहीत, असे नमूद करण्यात आले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0