माध्यान्ह भोजनासोबत नाश्त्याची सोय

माध्यान्ह भोजनासोबत नाश्त्याची सोय

नवी दिल्लीः नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात शाळांमध्ये माध्यान्ह भोजनाबरोबर नाश्त्याचाही समावेश करण्यात आला आहे. सकाळी शाळेत आल्यानंतर मुलांना पोषक नाश्

भारतीय कॉलेज कॅम्पसेस धोक्यात!
धन्यवाद कोरोना ?
या परीक्षेत सगळे नापास

नवी दिल्लीः नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात शाळांमध्ये माध्यान्ह भोजनाबरोबर नाश्त्याचाही समावेश करण्यात आला आहे. सकाळी शाळेत आल्यानंतर मुलांना पोषक नाश्ता मिळाल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत त्याने हातभार लागेल हा या धोरणाचा उद्देश आहे. सध्या माध्यान्ह भोजनाचा लाभ सरकारी शाळा व सरकार अनुदानित शाळांना दिला जातो. यात १ ली ते ८ वीपर्यंत शिकणार्या मुलांचा समावेश होतो.

कुपोषित मुले प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे या मुलांचे पोषण योग्यरित्या होणे व त्यांचे मानसिक आरोग्य व शारीरिक आरोग्य संतुलित राहण्यासाठी माध्यान्ह भोजनासोबत सकाळचा नाश्ता दिल्यास मुलांसाठी तो स्फूर्तीदायक ठरेल व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत त्याचे परिणाम दिसू लागतील असे या प्रस्तावात म्हटले आहे.

ज्या ठिकाणी गरम जेवण देणे शक्य नाही अशा ठिकाणी जेवणांमध्ये गूळ-शेंगदाणे व स्थानिक पातळीवरील मिळणारी फळे दिली जातात. आता नव्या शैक्षणिक धोरणात सर्व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून त्यांचे लसीकरण योग्यरित्या व्हावे यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. हे लसीकरण १०० टक्के व्हावे याकडे लक्ष दिले जाणार असून त्यासाठी आरोग्य कार्डही देण्याची योजना आहे.

अंगणवाडीमध्ये मुलांसाठी आरोग्य सोयी केल्या जाव्यात व मुलांच्या विकासावर देखरेख ठेवणारी स्वतंत्र यंत्रणाही या प्रस्तावात आहे.

पाच वर्षांखालील मुलांना प्राथमिक वर्ग किंवा बालवाटिकामध्ये प्रवेश देण्याचा प्रस्तावही या नव्या धोरणात आहे. यात मुलांना खेळावर आधारित, ज्ञानासंबंधी शिक्षण देणे, मुलांचे भावविश्व अधिक समृद्ध करणे, त्यांच्या मानसिक क्षमता वाढवण्याकडे लक्ष देणे अशा सूचना आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0