गोव्यात : ऑक्सिजनअभावी आणखी १३ रुग्णांचा मृत्यू

गोव्यात : ऑक्सिजनअभावी आणखी १३ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्लीः पणजीतील गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी ऑक्सिजन अभावी आणखी १३ कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर गोव्यात ऑक

बिहार-उ. प्रदेश सीमेवर गंगेत ७१ मृतदेह आढळले
उ. प्रदेशात ग्रामीण भागात कोविडचा उद्रेक
कोरोना मृत्यू : एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखाची मदत

नवी दिल्लीः पणजीतील गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी ऑक्सिजन अभावी आणखी १३ कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर गोव्यात ऑक्सिजन अभावी मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ७५ पर्यंत पोहचली असून राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहे. एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्याने सांगितले की शुक्रवारी रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहचवण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे १३ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.

गोवा सरकारने अद्याप या रुग्णांच्या मृत्यूबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सरकारने ऑक्सिजन पोहोचवण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे उत्तर दिले आहे. रुग्णांना ऑक्सिजन पुरवताना निर्माण होणारा दाब काही तांत्रिक कारणामुळे दुरुस्त झालेला नाही. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करता आलेला नाही. त्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

या संपूर्ण आठवड्यात गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा कुचकामी ठरल्याचे पुन्हा पुन्हा दिसून आले आहे. मंगळवारी २६ रुग्ण, बुधवारी २१, गुरुवारी १५ व शुक्रवारी १३ रुग्ण ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने मरण पावले आहेत.

दरम्यान राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने गोव्याचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. या मंत्र्यांचा बेजबाबदारपणा हा सामान्य रुग्णांच्या जीवाशी आल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0