गुपकार गठबंधन जाहीरनाम्यात काँग्रेसही सामील

गुपकार गठबंधन जाहीरनाम्यात काँग्रेसही सामील

श्रीनगरः जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे राज्य घटनेतून रद्द करण्यात आलेले कलम ३७० व ३५ अ परत लागू करण्यासाठी व काश्मीरला राज्याचा दर्जा परत

वैश्विक लिंगभेद यादीः 156 देशात भारताचे स्थान 140
टेनिसमधील लढवय्ये व त्यांच्या गाजलेल्या झुंजी
डॉ. कफील खान : फौजदारी कारवाई हायकोर्टाकडून रद्द

श्रीनगरः जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे राज्य घटनेतून रद्द करण्यात आलेले कलम ३७० व ३५ अ परत लागू करण्यासाठी व काश्मीरला राज्याचा दर्जा परत मिळवण्यासाठी सर्वपक्षीय संमतीने तयार झालेल्या गुपकार गठबंधन जाहीरनाम्यात काँग्रेसही सामील झाली आहे. या जाहीरनाम्यात पूर्वी काश्मीरमधील काँग्रेसवगळता बहुसंख्या राजकीय पक्ष सामील झाले होते. शुक्रवारी काँग्रेसचे दोन नेते यात सामील झाले. आगामी जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकात खोर्यातील सेक्युलर मते फुटू नये म्हणून काँग्रेस यात सामील झाली आहे. या निवडणुकांत काँग्रेस मतदारसंघाच्या वाटपात सामील होणार आहे.

गुपकार जाहीरनामा घटकपक्षांचे प्रमुख पद नॅशनल कॉन्फरन्सच्या फारुख अब्दुल्ला यांच्याकडे असून उपाध्यक्षपद पीडीपीच्या प्रमुख अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे आहे.

शुक्रवारी मेहबुबा मुफ्ती यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते गुलाम नबी मोंगा यांनी काँग्रेस गुपकार गठबंधनासोबत आहे, सर्व पक्षांशी आपण सहमत असून योग्य रित्या चर्चा झाल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे काश्मीर अध्यक्ष नासिर असलम वानी यांनी गुपकार गठबंधनाचा काँग्रेस हिस्सा आहे व जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकांतील मतदारसंघ वाटप चर्चेत काँग्रेस सामील होणार असल्याचे सांगितले. वानी यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी फारुक अब्दुल्ला यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी काँग्रेसचे दोन वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यांनी गठबंधन व जिल्हा विकास परिषदा निवडणुकात सामील होणार असल्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.

पण पीटीआयने दिलेल्या वृत्तात काँग्रेस गुपकार गठबंधनात सामील नसल्याचे म्हटले आहे. केवळ जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदारसंघाच्या वाटपात काँग्रेस सामील होणार आहे, असे पीटीआयचे वृत्त आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0