लॉकडाऊनमध्ये देवेगौडांच्या नातवाचे लग्न

लॉकडाऊनमध्ये देवेगौडांच्या नातवाचे लग्न

देशव्यापी लॉकडाऊन असतानाही माजी पंतप्रधान व जनता दल (एस)चे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा यांचा नातू व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मुलगा निख

तडफडणाऱ्या रुग्णांची रामदेवबाबांकडून थट्टा
पंतप्रधानपदाची उमेदवारी नाहीः नितीश कुमार यांची स्पष्टोक्ती
आसाममध्ये जमावाकडून डॉक्टरची हत्या, २१ अटकेत

देशव्यापी लॉकडाऊन असतानाही माजी पंतप्रधान व जनता दल (एस)चे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा यांचा नातू व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मुलगा निखील कुमारस्वामी यांचे शुक्रवारी एका फार्महाऊसवर लग्न झाले. या लग्न सोहळ्याला देवेगौडा यांचे अत्यंत जवळचे मोजकेच नातेवाईक व वधु रेवती यांचे कुटुंबीय उपस्थित होते असा खुलासा कुमारस्वामी यांनी केला आहे.

रेवती कर्नाटकचे माजी गृहनिर्माणमंत्री के. कृष्णप्पा यांची नात आहे.

सरकारने सांगितलेले सोशल डिस्टन्सिंग व खबरदारीचे सर्व नियम पाळून अत्यंत मोजक्याच उपस्थितांमध्ये हा लग्न सोहळा पार पडला. स्टेजवर फक्त ८ जण उपस्थित होते असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. लग्नाच्या प्रत्येक कार्यात सोशल डिस्टन्सिंग पाळले होते असाही दावा कुमारस्वामी यांनी केला आहे.

लॉकडाऊनमुळे या लग्नसोहळ्याला पक्षाचे आमदार व कार्यकर्ते व अन्य आप्तांना आपण बोलवू शकलो नाही अशीही खंत कुमारस्वामी यांनी ट्विटरवर व्यक्त केली. जेव्हा एकूण परिस्थिती पूर्वपदावर येईल तेव्हा आपण सर्वजण एकत्र मिळून जेवूया असेही कुमारस्वामी म्हणाले.

हा सोहळा कुमारस्वामी यांच्या रामनगर जिल्ह्यातील बिडाडी येथे केथागानाहल्ली येथे पार पडला.

लॉकडाऊनचे नियम मोडल्याचा भाजपचा आरोप

दरम्यान, कुमारस्वामी यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यावर भाजपने तीव्र टीका करत या सोहळ्यास किमान १५० ते २०० गाड्या आल्या होत्या, आणि त्याला प्रशासनाने परवानगी दिली होती असा आरोप रामनगर जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष एम, रुद्रेश यांनी केला आहे. आजपर्यंत रामनगर कोरोना विषाणूपासून संरक्षित होते व हा जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता पण आता या लग्न सोहळ्यामुळे येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कुमारस्वामी यांच्यावर जाईल, असाही इशारा रुद्रेश यांनी दिला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: