राज्यात रुग्ण संख्या ३ लाखांच्या पुढे

राज्यात रुग्ण संख्या ३ लाखांच्या पुढे

राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने आज ३ लाखांचा टप्पा ओलांडला. रुग्णांची संख्या ३ लाख १० हजार, ४५५ इतकी झाली आहे. राज्यात आज ९,५१८ कोरोना बाधि

लॉकडाऊन काळजीपूर्वक उठवावा – जागतिक आरोग्य संघटना
कोरोनासाठी क्लोरोक्विन घेण्याची घाई नको
देशात कोरोनाचे ११४ रुग्ण

राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने आज ३ लाखांचा टप्पा ओलांडला. रुग्णांची संख्या ३ लाख १० हजार, ४५५ इतकी झाली आहे.

राज्यात आज ९,५१८ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या आता ३,१०,४५५ इतकी झाली आहे. आज ३,९०६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ६९ हजार ५६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १ लाख २८ हजार ७३० इतकी आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के आहे. अशी माहिती राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन दिली.

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या आजही मोठी होती. गेल्या २४ तासात १ हजार ४६ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. ६४ जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा १लाख १ हजार २२४ इतका असून, आतापर्यंत एकूण ५,७११ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्ता मुंबईत २३ हजार ८२८ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

आज पुण्यात १ हजार ५०८ नव्या रुग्णांची नोंद झाली. ७३० रुग्ण बरे झाले. तर कोरोनामुळे ४१ रुग्णांचे मृत्यू झाल्याचे महापालिकेने कळविले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजार ५३८ इतकी झाली असून, आज १३४ नवे रुग्ण आढळले आहेत. आकोल्यामध्ये आतापर्यंत एकूण १०२ रुग्ण दगावले असून,  एकूण रुग्ण संख्या २ हजार १३४ इतकी झाली आहे.

रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १० हजारांच्या वर पोहोचली असून, आज ५२४ नवे रुग्ण आढळले. एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

आत्तापर्यंत १५ लाख चाचण्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यांपैकी ३ लाख १० हजार ४५५ नमुने पॉझिटिव्ह (१९.८५ टक्के) आले. राज्यात ७ लाख ५४ हजार ३७० लोक लोक घरी विलगीकरणात आहेत, तर ४५ हजार ८४६ लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0