कराचीत रहिवासी भागात विमान कोसळले; ६६ ठार

कराचीत रहिवासी भागात विमान कोसळले; ६६ ठार

कराची : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे ए-३२० हे एक प्रवासी विमान शुक्रवारी कराची शहरातील मॉडेल कॉलनी भागात कोसळून ६६ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. या वि

पाकिस्तानात पेट्रोल दराचा उच्चांक
पाकिस्तानचा मानवतावादी मल्याळी कॉम्रेड: बी. एम. कुट्टी
कराची-रावळपिंडी ट्रेनला आग; ७३ प्रवासी ठार

कराची : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे ए-३२० हे एक प्रवासी विमान शुक्रवारी कराची शहरातील मॉडेल कॉलनी भागात कोसळून ६६ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. या विमानात ९१ प्रवासी व ८ विमान कर्मचारी होते.

हे विमान लाहोरहून कराचीकडे निघाले होते. कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाने तीन ते चार वेळा उतरण्याचा प्रयत्न केला पण ते विमानतळानजीकच्या एका मोबाईल टॉवरवर आदळले आणि नंतर मॉडेल कॉलनीमधील काही घरांवर कोसळले, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या दुर्घटनेत मरण पावलेल्यांचा आकडाही वाढू शकतो कारण रहिवासी भागात हे विमान कोसळल्याने तेथील काही मृत्यू असू शकतात पण या दुर्घटनेत तीन विमान प्रवासी जिवंत सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

ज्या मॉडेल कॉलनीत हे विमान कोसळले तेथील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून व्हिडिओ फुटेजमध्ये अनेक टन ढिगार्यात मोठ्या प्रमाणात रहिवासी अडकल्याचे सांगितले जात आहे. विमानाचे अनेक भाग इतस्तत विखुरले असून मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू होते. शेकडो नागरिक लॉकडाऊनमध्येही रस्त्यावर येऊन ढिगार्यात अडकलेल्यांचा शोध घेताना दिसत होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0