नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या एप्रिल व मे महिन्याच्या काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ३६ लाख २ हजार खातेधारकांनी आपल्या खात्यातील रक्कम काढली आहे. य
नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या एप्रिल व मे महिन्याच्या काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ३६ लाख २ हजार खातेधारकांनी आपल्या खात्यातील रक्कम काढली आहे. या खातेधारकांपैकी ७४ टक्के खातेधारकांचे मासिक वेतन १५ हजार रु. पेक्षा कमी असून लॉकडाऊनचा तडाखा कमी वेतन असलेल्या नोकरदारांना सर्वाधिक बसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
तर ज्यांचा मासिक पगार ५० हजार रु.हून अधिक होता त्या खातेदारांपैकी केवळ २ टक्के खातेदारांनी आपली रक्कम काढून घेतली आहे.
शिवाय १५ हजार रु. ते ५० हजार रु. दरम्यान दरमहा वेतन असणार्या २४ टक्के नोकरदारांनी आपली पीएफ रक्कम काढून घेतली आहे.
सरकारने या संदर्भात ९ जून रोजी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात एप्रिल व मे महिन्यात ३६ लाख २ हजार प्रकरणे निकालात काढली असून त्यातून ११ हजार ५४० कोटी रु. संबंधितांना दिले असल्याचे म्हटले आहे.
यातील ४ हजार ५८० कोटी रु.चे १५ लाख ५४ हजार दावे असून त्यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत कोविड-१९ महासाथीच्या संकटात आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली होती.
या लॉकडाऊनच्या काळात ईपीएफओच्या ५० टक्के कर्मचार्यांनी काम केले. प्रत्येक प्रकरण किमान ३ दिवसांत निकालात काढण्यात येत होते.
गेल्या वर्षांत एप्रिल व मे महिन्यात ३३ लाख ५० हजार प्रकरणांचा ईपीएफओने निपटारा केला होता.
मूळ बातमी
COMMENTS