नोव्हेंबरमध्ये भारतात कोरोनाचे रुग्ण सर्वोच्च – अभ्यासगटाचे मत

नोव्हेंबरमध्ये भारतात कोरोनाचे रुग्ण सर्वोच्च – अभ्यासगटाचे मत

नवी दिल्लीः भारतात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात सर्वोच्च होईल असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसी

मुंबईत कोरोनाचे दोन संशयित, चीनमध्ये २६ मृत्यू
कोविड-१९ : ‘भारत बायोटेक’ला मानवी चाचणीस परवानगी
कोरोना – उपाय एकसूत्र हवेत

नवी दिल्लीः भारतात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात सर्वोच्च होईल असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने स्थापन केलेल्या ऑपरेशन्स रिसर्च ग्रुप या संशोधन गटाने म्हटले आहे. ही महासाथ ८ आठवड्याने सर्वोच्च दिसेल तर लॉकडाऊनमुळे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढण्याचा कालावधी ३४ ते ७६ दिवसाने पुढे ढकलला गेला असेही या अहवालाचे म्हणणे आहे.

याच काळात देशातील कोरोना रुग्णांच्या संसर्ग आकडेवारीत ६९ ते ९७ टक्के इतकी घसरण होणार असून लॉकडाऊनच्या काळातील उपाय योजनांचा हा परिणाम दिसू लागेल, असे या संशोधक गटाचे म्हणणे आहे. कोरोना रुग्णांची संख्या नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक दिसणार असल्याने या काळात देशातील आरोग्य व्यवस्थेवर अधिक भर देता येईल, असे या गटाचे म्हणणे आहे.

लॉकडाऊन उठल्यानंतर आरोग्य व्यवस्थेवर भर दिल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोना संसर्गाची टक्केवारी ६० टक्क्यापर्यंत जाईल. त्यानंतर साडे पाच महिन्यानंतर आयसोलेशन बेड, साडेचार महिन्यांनंतर आयसीयू बेड व साधारण चार महिन्यांनी व्हेंटिलेटरची कमतरता देशात जाणवू लागेल असाही एक अंदाज या गटाने व्यक्त केला आहे.

सरकारने आरोग्य व्यवस्थेवर अधिक खर्च केला तर या महासाथीचे प्रमाण खाली आणता येईल पण या लॉकडाऊनच्या काळात चाचण्या, उपचार व रुग्णांचे विलगीकरण यावर अधिक लक्ष्य केंद्रीत केले तर कोरोना प्रकरणे ७० टक्क्याने कमी होतील तर संक्रमण २७ टक्क्याने घसरेल असेही या गटाचे म्हणणे आहे.

सध्याच्या काळात योग्य उपचार पद्धतीमुळे कोरोनामुळे मरण पावणार्या रुग्णांच्या संख्येत ६० टक्क्याने घसरण झाली आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी लक्षात येऊन कोणत्या संसाधनावर भर द्यावा लागत आहे, याचा अभ्यास करण्यास मदत झाली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक होण्यास बराच वेळ असल्याकारणाने या काळात देशातल्या आरोग्य व्यवस्थेतील मूलभूत बाबींवर सरकारला लक्ष द्यावे लागेल. शिवाय सरकारला आपली आरोग्य व्यवस्था अधिक सदृढ करता येईल, या काळात कोरोनावरची लस मिळाली तर भारत या महासाथीवर नियंत्रण आणण्यात यशस्वी ठरणारा देश ठरेल असेही अनुमान या संशोधक गटाने व्यक्त केले आहे.

रविवारी देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख २० हजारपेक्षा अधिक झाली असून या महासाथीत मृतांची आकडेवारी ९,१९५ इतकी झाली आहे. भारतात गेल्या तीन दिवसात सरासरी १० हजार रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असून जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणारा भारत चौथा देश झाला आहे.

या संशोधक गटाच्या अहवालात काही त्रुटी आहेत व त्यावर आयसीएमआरने शिक्कामोर्तब केलेले नाही. त्याचबरोबर काही तज्ज्ञांनी या अहवालावर अद्याप आपले मत व्यक्त केलेले नाही.

उदाहरण द्यायचे तर, लॉकडाऊनमधला सहावा आठवडा संपल्यानंतर ६ मे रोजी देशात ५ लाख,२९ हजार ८९२ कोरोनाच्या केस आढळतील असा अंदाज होता पण प्रत्यक्षात सध्या हा आकडा ३ लाख ३२ हजारपर्यंत गेला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0