नवी दिल्ली : कोरोनामुळे देश लॉकडाऊन असला तरी देशातील सुमारे सहा कोटीहून अधिक खातेदारांना पैसे काढण्याची सोय कर्मचारी भविष्य निधीने (ईपीएफ) दिली आहे. य
नवी दिल्ली : कोरोनामुळे देश लॉकडाऊन असला तरी देशातील सुमारे सहा कोटीहून अधिक खातेदारांना पैसे काढण्याची सोय कर्मचारी भविष्य निधीने (ईपीएफ) दिली आहे. या संदर्भातील एक अधिसूचना जारी करण्यात आली असून ईपीएफ खातेधारक आपले तीन महिन्यांचे मूळ वेतन व महागाई भत्ता किंवा त्यांच्या खात्यात जमा झालेल्या एकूण रकमेतील एक तृतीयांश एवढी रक्कम काढू शकणार आहेत. ही रक्कम पुन्हा खात्यात ठेवण्याची गरजही नाही, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे देशभरातील सर्व उद्योगधंदे, खासगी कार्यालये ठप्प झाली असून या क्षेत्रात काम करणार्या लाखो ईपीएफधारकांना यातून दिलासा मिळावा म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे.
या संदर्भात कामगार खात्याने कर्मचारी भविष्य निधी योजना १९५२ कायद्यातील दुरुस्तींचा आधार घेत २८ मार्च २०२०ला ही अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असंघटित क्षेत्राता १ लाख ७४ हजार कोटी रु.चे पॅकेज जाहीर करताना ईपीएफ खात्यासंदर्भात माहिती दिली होती.
मूळ बातमी
COMMENTS