नवी दिल्लीः कोरोना महासाथीत अद्याप शिक्षणसंस्था सुरू न झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांसाठी आपला ९ वी ते १२ वीचा अभ
नवी दिल्लीः कोरोना महासाथीत अद्याप शिक्षणसंस्था सुरू न झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांसाठी आपला ९ वी ते १२ वीचा अभ्यासक्रम ३० टक्क्याने कमी केला असून ११ वीच्या राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकातील संघराज्यवाद, नागरिकत्व, राष्ट्रवाद व धर्मनिरपेक्षता हे धडे कमी केले आहेत. त्याचबरोबर स्थानिक स्वराज संस्थांची गरज काय? व भारताच्या इतिहासातील स्थानिक स्वराज संस्थांची प्रगती, हेही भाग कमी केले आहेत. इंग्रजी विषयातील लेटर टू एडिटर व जॉब अप्लिकेशन लेटर हा भाग वगळण्यात आला आहे. मुलांवरचे शैक्षणिक ओझे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमात कपात करण्यात आल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.
सीबीएसईने १०वीच्या अभ्यासक्रमातील लोकशाही व वैविध्य, लिंगभेद, धर्म आणि जात, लोकप्रिय चळवळी व लोकशाहीसमोरील आव्हाने असे धडे कमी केलेले आहेत.
१२वीच्या अभ्यासक्रमातील भारताचे परराष्ट्रसंबंध हा विषय वगळण्यात आला असून पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळशी असलेले भारताचे संबंध, भारताच्या आर्थिक विकासाचे बदलते स्वरुप, भारतातील सामाजिक चळवळी व नोटबंदी हे विषय वगळण्यात आले आहेत.
कोरोना महासाथ व लॉकडाऊनमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्याने सीबीएसईने अभ्यासक्रम कमी करण्याविषयी विविध शिक्षणतज्ज्ञांकडून व अन्य समाजघटकांकडून मते मागवून घेतली होती, त्यानुसार सीबीएसईला सुमारे १५ हजार सूचना आल्या. या सूचनेनुसार अभ्यासक्रम ३० टक्के कमी करण्यात आ,ला असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले.
या संदर्भात सर्व शालेय व्यवस्थापनांना व शिक्षकांना कळवण्यात आले असून वगळलेला अभ्यासक्रम गरज पडेल तेथे विद्यार्थ्यांना शिकवावेत. जो वगळलेला अभ्यासक्रम आहे तो अंतर्गत मूल्यांकन व अंतिम वार्षिक परीक्षेत नसेल, असेही निशंक यांनी स्पष्ट केले.
मूळ बातमी
COMMENTS