नवी दिल्लीः २०२०-२१ या वित्तीय वर्षांच्या पहिल्या पाच महिन्यात (एप्रिल ते सप्टेंबर) दरम्यान देशभरात ८३ लाख नवे मनरेगा कार्डधारकांची नोंद झाली आहे. गेल
नवी दिल्लीः २०२०-२१ या वित्तीय वर्षांच्या पहिल्या पाच महिन्यात (एप्रिल ते सप्टेंबर) दरम्यान देशभरात ८३ लाख नवे मनरेगा कार्डधारकांची नोंद झाली आहे. गेल्या ७ वर्षांतला हा उच्चांक असून ही आकडेवारी मनरेगाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार २०१४-१५ या वर्षांत २८,३४,६०० नव्या मनरेगा कार्डची नोंदणी झाली होती. त्यानंतर २०१५-१६ या आर्थिक वर्षांत ५४,४६,३९९, आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये ७७,३२,३१७, आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ७७,०२,९८३, आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये ६२,३७,६२६, आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये ६४,७०,४०२ तर आर्थिक वर्ष २०२०-२१च्या सप्टेंबरपर्यंत ८३,०२,८३४ इतक्या नव्या कार्डची नोंदणी झालेली आहे.
२०१९-२०मध्ये ६४ लाख ७० हजार कार्ड देण्यात आले त्यातुलनेत यंदाची वाढ २८.३२ टक्के इतकी आहे.
कोरोना महासाथीमुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित आपल्या घरी परतले होते त्याने बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली. ही बेरोजगारी आता मनरेगाकडे वळली आहे.
देशात सर्वाधिक मनरेगा रोजगार कार्ड उ. प्रदेशात २१ लाख ९ हजार इतकी वाटण्यात आली असून त्यानंतर बिहारमध्ये ११ लाख २२ हजार, प. बंगालमध्ये ६ लाख ८२ हजार, राजस्थानात ६ लाख ५८ हजार, म. प्रदेशात ५ लाख ५६ हजार रोजगार कार्ड वाटण्यात आली आहेत.
वरील आकडेवारीनुसार दिसते की, रोजगार कार्ड वाटपातील सर्वाधिक टक्केवारी -१७२ टक्के वाढ- उ. प्रदेशात दिसून येते. गेल्या वर्षी तेथे ७ लाख ७२ हजार कार्ड देण्यात आले होते. त्यानंतर आंध्रात १५४ टक्के वाढ झाली. तर राजस्थानात ६९ टक्के वाढ दिसून आली आहे.
महिलांच्या टक्केवारीत वाढ
गेल्या ५ महिन्यात रोजगार कार्ड घेणार्या महिलांच्या टक्केवारीत ५२.४६ टक्के वाढ झाली आहे.
मनरेगा योजनेत ग्रामीण भागातील प्रत्येकी एक लाभार्थी कुटुंबातील एकाला कार्ड दिले जाते.
एखाद्या वेळेस कुटुंब कायमस्वरुपी शहरात वास्तव्यास गेल्यास किंवा ग्राम पंचायतमध्ये गेल्यास किंवा डुप्लिकेट कार्ड आढळून आल्यास त्या कुटुंबाचे मनरेगा कार्ड रद्द केले जाते.
या आर्थिक वर्षात १० लाख ३९ लाख मनरेगा कार्ड रद्द झाले असून गेल्या आर्थिक वर्षात हा आकडा १३ लाख ९७ हजार इतका होता.
३ सप्टेंबर अखेर एक मनरेगा कार्डची संख्या १४ कोटी ३६ लाख इतकी आहे.
मूळ बातमी
COMMENTS