१ रु.दंड भरला, पण निर्णय अमान्यचः भूषण

१ रु.दंड भरला, पण निर्णय अमान्यचः भूषण

नवी दिल्लीः ट्विटच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयावर टीका केल्याप्रकरणातील दोषी विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध

हैदराबाद पोलिसांचे वेगवान ‘बुलेट कोर्ट’!
अमेझॉन प्राइमची ‘तांडव’वरून माफी
आकार पटेल यांना परदेशात जाण्याची तूर्त मनाई

नवी दिल्लीः ट्विटच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयावर टीका केल्याप्रकरणातील दोषी विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये १ रु.चा दंड भरला. पण हा दंड भरताना भूषण यांनी आपण हा दंड भरला असला तरी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपणास मान्य नसून न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या ३१ ऑगस्टला ट्विटवरून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणात भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने एक रु.चा दंड वा तीन महिन्याची शिक्षा सुनावली होती.

सोमवारी दंड भरण्याअगोदर प्रसारमाध्यमांशी बोलताना भूषण यांनी दंड भरण्यासाठी देशभरातून आपल्याला मदत मिळाल्याचे सांगितले. या मदतीचा एक कोश तयार करण्यात येईल. या कोशातून ज्या व्यक्ती सरकारच्या विरोधात आवाज उठवला म्हणून तुरुंगात गेल्या आहेत, त्यांच्यासाठी कायदेशीर मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. भूषण यांनी सत्तेच्या विरोधात बोलणार्यांचा आवाज दडपणार्यांचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत जेएनयूतील माजी विद्यार्थी उमर खालिद याच्या अटकेबाबतही चिंता व्यक्त केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0