‘बाबरी मशीद प्रकरणी ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय द्या’

‘बाबरी मशीद प्रकरणी ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय द्या’

नवी दिल्लीः १९९२च्या बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणी आपला निकाल येत्या ३० सप्टेंबर द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने लखनौतील विशेष सीबीआय न्यायालया

बाबरी पाडण्यासाठी करसेवा केल्याचा फडणवीसांचा दावा
बाबरी मशीद कारस्थानात मी नव्हतोः अडवाणी
बाबरी कटाचा अविश्वसनीय निकाल

नवी दिल्लीः १९९२च्या बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणी आपला निकाल येत्या ३० सप्टेंबर द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने लखनौतील विशेष सीबीआय न्यायालयाला दिले आहेत. न्यायालयाने हा आदेश देताना विशेष सीबीआय न्यायालयाला हा खटला पूर्ण करण्यासाठी एक महिन्यांचीही मुदतवाढही दिली आहे. पहिल्यांदा ३१ ऑगस्टपर्यंत निकाल द्यावा असे सांगण्यात आले होते.

बाबरी मशीद खटल्यात ३२ आरोपी असून त्यात भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी व उमा भारती हे प्रमुख आरोपी आहेत. या सर्वांनी सीबीआय न्यायालयापुढील आपल्या जबाबात बाबरी मशीद पाडण्याच्या कटात आपला सहभाग नसल्याचा दावा केला होता. त्यावेळच्या काँग्रेस सरकारने राजकीय हेतूने आपल्याला गोवल्याचाही दावा या नेत्यांनी केला होता.

लखनौतील विशेष सीबीआय न्यायालयाने सीआरपीसीतील ३१३ कलमानुसार सर्व ३२ आरोपींचे जबाब नोंदवून घेतले आहे. या अगोदर या खटल्याचा निर्णय ३१ ऑगस्टपर्यंत द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते, पण शनिवारी न्या. नरीमन, न्या. नवीन सिन्हा, न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या पीठाने हा निकाल ३० सप्टेंबरपर्यंत लावावा असे आदेश दिले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: