‘हफपोस्ट इंडिया’ने गाशा गुंडाळला

‘हफपोस्ट इंडिया’ने गाशा गुंडाळला

नवी दिल्लीः अमेरिका स्थित डिजिटल मीडिया कंपनी ‘हफपोस्ट’ची भारतातील डिजिटल प्रकाशन ‘हफपोस्ट इंडिया’ने २४ नोव्हेंबरपासून आपले काम बंद केले आहे. गेली सहा

श्रीलंकेत आंदोलक राष्ट्रपतींच्या निवासस्थानात घुसले, पंतप्रधानांची राजीनाम्याची घोषणा
हाथरसः आरोपींच्या कारागृहात भाजप खासदार पोहचले
झारखंड: सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

नवी दिल्लीः अमेरिका स्थित डिजिटल मीडिया कंपनी ‘हफपोस्ट’ची भारतातील डिजिटल प्रकाशन ‘हफपोस्ट इंडिया’ने २४ नोव्हेंबरपासून आपले काम बंद केले आहे. गेली सहा वर्षे हे डिजिटल प्रकाशन काम करत होते. मोदी सरकारने देशातील डिजिटल मीडिया कंपन्यांमध्ये परदेशी आर्थिक मदतीवर अंकुश आणल्याने त्याचा थेट परिणाम ‘हफपोस्ट इंडिया’वर झाला आहे.

डिजिटल मीडियात परदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्के इतकी ठेवण्यात आली आहे. या पूर्वी अशी मर्यादा नव्हती. पण नव्या धोरणांमुळे भारतात काम करणे शक्य नसल्याचे ‘हफपोस्ट इंडिया’ कंपनीच्या सूत्रांनी ‘द वायर’ला सांगितले.

‘हफपोस्ट इंडिया’मध्ये १२ पत्रकार काम करत होते.

अमेरिकेतील संपर्क क्षेत्रातील बलाढ्य मानल्या जाणार्या ‘व्हेरिजॉन’ने ‘हफपोस्ट’ कंपनी अन्य एक कंपनी ‘बझफीड’ला विकली होती. पण भारत व ब्राझीलमध्ये हा करार झाला नव्हता.

‘हफपोस्ट इंडिया’ बंद करण्याचा निर्णय ‘बझफीड’चे संस्थापक व सीईओ जोनाह परेटी यांनी जाहीर करताना भारतातील परदेशी गुंतवणुकीच्या नियमांकडे बोट दाखवले. परदेशी कंपन्यांना त्यांच्या वृत्तांवर नियंत्रण मानवत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुमारे सहा कोटी रु.च्या भांडवलावर ‘हफपोस्ट इंडिया’ २०१५मध्ये सुरू झाले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0