ब्रिटनमधून आलेले ५ भारतीय कोरोना पॉझिटीव्ह

ब्रिटनमधून आलेले ५ भारतीय कोरोना पॉझिटीव्ह

मुंबईः ब्रिटनहून भारतात आलेल्या ५ भारतीय प्रवाशांना कोविडची बाधा झाल्याचे मंगळवारी आढळून आले. या प्रवाशांना नव्या प्रकारच्या कोरोनाची बाधा झाली आहे की

मिस ट्रस
ब्रिटनकडून विजय मल्ल्या दिवाळखोर घोषित
देशभंजक नायक

मुंबईः ब्रिटनहून भारतात आलेल्या ५ भारतीय प्रवाशांना कोविडची बाधा झाल्याचे मंगळवारी आढळून आले. या प्रवाशांना नव्या प्रकारच्या कोरोनाची बाधा झाली आहे की नाही याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

२६६ प्रवाशांचे हे विमान सोमवारी रात्री उशीरा नवी दिल्लीत आले व यातील प्रवाशांची कोरोना तपासणी केली असता ५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. या प्रवाशांना ब्रिटनमध्ये उद्भवलेल्या नव्या प्रकाराच्या कोरोना विषाणूची लागण झाली की नाही याबाबत नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलकडून माहिती घेतली जात आहे. त्यांच्याकडून तपासणी झाल्यानंतर स्पष्ट चित्र होईल, असे सरकारी प्रवक्त्यांनी सांगितले.

सोमवारीच भारताने ब्रिटनकडून येणार्या सर्व विमानांना बंदी घातली आहे. या काळात दोन विमाने भारतात आली आहेत. एक विमान मुंबईमध्ये व एक विमान अमृतसरमध्ये उतरले आहे. यातील अमृतसरमध्ये उतरलेल्या २४० प्रवाशांच्या कोरोना चाचणीचा निकाल अद्याप यायचा आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: