आरोग्य हा मूलभूत अधिकार हवाः कैलास सत्यार्थी

आरोग्य हा मूलभूत अधिकार हवाः कैलास सत्यार्थी

नवी दिल्लीः आरोग्य हा मूलभूत अधिकार केल्यास देशातील आरोग्य सेवा मजबूत होईल, असे मत नोबेल पुरस्कारविजेते व बाल अधिकार कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांनी

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, हाच छद्मविज्ञानाचा पराभव
हरेन पंड्या खून खटल्यात १२ दोषी; ७ जणांना जन्मठेप
४ राज्ये व पुड्डूचेरी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

नवी दिल्लीः आरोग्य हा मूलभूत अधिकार केल्यास देशातील आरोग्य सेवा मजबूत होईल, असे मत नोबेल पुरस्कारविजेते व बाल अधिकार कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, कोरोनाच्या महासाथीत देशातील आरोग्य व्यवस्थेतील मोठ्या प्रमाणात त्रुटी दिसून आल्या. त्यात दुसर्या लाटेने तर निराशा दिसून आली. देशभरात ऑक्सिजन, औषधे, रुग्णालयातील बेड यांची अभूतपूर्व टंचाई दिसून आली. अनेक नागरिकांना या सोई वेळीच न मिळाल्याने प्राण गमवावे लागले. आपल्या देशातल्या गरीब, वंचित, सामान्य व्यक्तीला मूलभूत आरोग्य सेवा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य हा मूलभूत अधिकारात समाविष्ट केल्यास त्याने देशातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्रीय व मजबूत होऊ शकते, असे सत्यार्थी म्हणाले. ही वेळ अशा सुधारणांची असल्यावरही त्यांनी जोर दिला.

आपण शिक्षण हा मूलभूत अधिकार केल्याने शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील अनेक घटकांपर्यंत शिक्षण पोहचत आहे. अशा वेळी आरोग्य ही बाब मूलभूत अधिकारात आणल्यास सर्वत्र पसरलेली निराशा, भय व अनिश्चितेच्या वातावरणात सकारात्मक संदेश पसरेल असे सत्यार्थी म्हणाले.

सत्यार्थी यांनी कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता व्यक्त करत या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय स्तरावर टास्कफोर्स असण्याची गरज व्यक्त केली. या घडीला केंद्र व राज्यांनी मुलांच्याप्रती आपल्या धोरणात बदल करावेत अशीही विनंती त्यांनी केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0