नवी दिल्लीः खासगी रुग्णालयात कोविड-१९ प्रतिबंधक लसींची किंमत केंद्र सरकारने निश्चित केली आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयात कोविशिल्डच्या एका खुराकाची कि
नवी दिल्लीः खासगी रुग्णालयात कोविड-१९ प्रतिबंधक लसींची किंमत केंद्र सरकारने निश्चित केली आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयात कोविशिल्डच्या एका खुराकाची किंमत ७८० रु. कोवॅक्सिनची १४१० रु. व स्पुटनिक-५ ची १,१४५ रु. निश्चित करण्यात आली आहे.
सरकारने या अगोदर या लसींवर सेवा शुल्क १५० रु. निश्चित केले आहे. या दराव्यतिरिक्त अधिक किंमत कोणतेही खासगी रुग्णालय वसूल करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे केंद्रीय आरोग्य खात्याच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या लसी वाढीव दराने नागरिकांना मिळतील अशी भीती वाटल्याने राज्यांनी अशा रुग्णालयांवर लक्ष ठेवावे असेही केंद्राने राज्य सरकारना सांगितले आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया खासगी रुग्णालयांना कोविशिल्डचा एक खुराक ६०० रु. दराने विकत असून त्यात जीएसटी जमा केलेला नाही.
तर भारत बायोटेकने कोवॅक्सिनचा प्रती खुराक दर १२००रु. निश्चित केला आहे.
स्पुटनिक-५चा प्रती खुराक दर ९४८ रु. निश्चित केला आहे.
४४ कोटी खुराकांची ऑर्डर
दरम्यान मंगळवारी केंद्र सरकारने कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीच्या ४४ कोटी खुराकांची ऑर्डर दिली आहे. हा खुराक येत्या डिसेंबर अखेर मिळेल व देशातील लसीकरण होईल, असा केंद्राचा अंदाज आहे.
४४ कोटींपैकी २५ कोटी खुराक कोविशिल्डचे तर १९ कोटी खुराक कोवॅक्सिनचे आहेत.
COMMENTS