‘मन की बात’च्या महसूलात ९० टक्क्यांनी घसरण

‘मन की बात’च्या महसूलात ९० टक्क्यांनी घसरण

नवी दिल्लीः २०१८-१९ या काळात सर्वाधिक महसूल मिळवून देणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची लोकप्रियता वेगाने घसरली असून त्यात

नमो टीव्हीवर इतकी मर्जी का?
‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटांचे खेळ : एक प्रचारकी खेळी
उद्धव वाकले पण मोडले नाहीत…

नवी दिल्लीः २०१८-१९ या काळात सर्वाधिक महसूल मिळवून देणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची लोकप्रियता वेगाने घसरली असून त्यातून मिळणार्या महसूलातही ९० टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

सोमवारी संसदीय प्रश्नोत्तरात केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने सादर केलेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षांत या कार्यक्रमाच्या महसूलात ९० टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेतल्या खासदार फौजिया खान यांनी प्रश्न विचारला असता माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी हे उत्तर दिले. त्यांनी महसुलात घसरण झाली असली तर मोदींच्या कार्यक्रमामुळे रेडिओची लोकप्रियता वाढलेली असून रेडिओला उर्जितावस्था आल्याचे स्पष्ट केले.

२०२०-२१ या वर्षांत ‘मन की बात’ने १ कोटी २ लाख रु.महसूल मिळवून दिला तर २०१७-१८ या काळात महसूलाचा आकडा १० कोटी ६४ लाख रु. इतका होता. या आकडेवारीची तुलना करता ही ९० टक्के घसरण आहे.

‘मन की बात’ हा कार्यक्रम मोदी पंतप्रधान झाल्यानंतर २०१४मध्ये सुरू करण्यात आला होता.

२०१४-१५ या काळात या कार्यक्रमाने १ कोटी १६ लाख रु., २०१५-१६ या आर्थिक वर्षांत २ कोटी ८१ लाख रु., २०१६-१७मध्ये ५ कोटी १४ लाख रु., २०१८-१९ या काळात ७ कोटी ४७ लाख रु., तर २०१९-२०मध्ये २ कोटी ५६ लाख रु. महसूल मिळवून दिला होता.

‘मन की बात’ सुरू झाल्यापासून या कार्यक्रमाने सरकारच्या तिजोरीत ३० कोटी ८० लाख रु.ची भर घातली असून हा कार्यक्रम सर्व आकाशवाणी व दूरदर्शन वाहिन्यांवर दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित करण्यात येतो.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0