ग्रामपंचायत पोटनिवडणुकाः २१ डिसें.ला मतदान

ग्रामपंचायत पोटनिवडणुकाः २१ डिसें.ला मतदान

मुंबई: राज्यातील ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ७ हजार १३० सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०

काश्मीर : पंचायत समितीमधील ६१ टक्के जागा रिक्त
आसामः भाजपच्या जाहिरातीवरून ८ वर्तमानपत्रांविरोधात गुन्हा
उत्तरप्रदेश जिंकला तरी भाजपचा पराभवच होणार!

मुंबई: राज्यातील ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ७ हजार १३० सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी गुरुवारी दिली.

निर्वाचित सदस्याचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.

या निवडणुकांसाठी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२०१या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी ७ डिसेंबर २०२१ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३ पर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान २१ डिसेंबर २०२१ रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३.००पर्यंतच असेल. या सर्व ठिकाणी २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: