ऑस्करच्या यादीत ‘जय भीम’चा समावेश

ऑस्करच्या यादीत ‘जय भीम’चा समावेश

नवी दिल्लीः ९४ व्या ऑस्कर पुरस्काराच्या नामांकन यादीत तमिळ चित्रपट ‘जय भीम’चा समावेश करण्यात आला आहे. २०२१साली प्रदर्शित झालेला हा तमिळ चित्रपट असून द

जगभरात अर्धा अब्ज लोक बेकार : यूएन अहवाल
काम करणाऱ्या मुलींचा माग ठेवण्याचा म.प्रदेश सरकारचा विचार
सोशल मीडियाः मनाला ओळखणारे माध्यम

नवी दिल्लीः ९४ व्या ऑस्कर पुरस्काराच्या नामांकन यादीत तमिळ चित्रपट ‘जय भीम’चा समावेश करण्यात आला आहे. २०२१साली प्रदर्शित झालेला हा तमिळ चित्रपट असून दक्षिण भारतातील सुपरस्टार व ‘सिंघम’ फेम अभिनेते सूर्या हे या चित्रपटाचे नायक आहेत. ऑस्कर समितीने चित्रपटांची यादी गुरूवारी रात्री जाहीर केली. यात जगभरातील एकूण २७६ चित्रपट असून भारताकडून ‘जय भीम’ व्यतिरिक्त मल्याळम चित्रपट ‘मरक्कर’चाही समावेश करण्यात आला आहे. ‘मरक्कर’ चित्रपटात मुख्य भूमिका प्रसिद्ध मल्याळी अभिनेते मोहन लाल यांची आहे.

ऑस्कर समितीने निवडलेल्या सर्व चित्रपटांवर मतदान घेतले जाणार आहे. हे मतदान २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी या दरम्यान होईल. त्यानंतर ८ फेब्रुवारीला चित्रपटातल्या विविध विभागांसाठीची नामांकने जाहीर करण्यात येईल. त्यानंतर ऑस्करचा अंतिम पुरस्कार सोहळा २७ मार्च रोजी अमेरिकेत होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0