उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या मालमत्तेवर ईडीची कारवाई

उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या मालमत्तेवर ईडीची कारवाई

मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर मंगळवारी ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईत ईडीने पाटणकर यांच्या

ईडीचे गुन्हे असल्याने सिद्दिक कप्पन अजूनही तुरुंगातच
चिदंबरम यांच्या अटकेची ईडीलाही परवानगी
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक

मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर मंगळवारी ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईत ईडीने पाटणकर यांच्या मालकीचे ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्टमधील ११ फ्लॅट जप्त केले असून महाविकास आघाडी सरकारला हा मोठा राजकीय धक्का आहे. या ११ फ्लॅटची किंमत साडे सहा कोटी रु. इतकी आहे.

ईडीच्या या कारवाईवरून महाविकास आघाडीतील नेते व भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून मुख्यमंत्र्यांनी बुधवारी सकाळी १० वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.

ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका करत केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला. गेली काही वर्षे विरोधकांना दाबवण्यासाठी सत्ताधारी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करतो आहे. कुणाला तरी त्रास द्यायचा म्हणून कारवाया सुरू असल्याचं दिसतंय, ५ ते १० वर्षांपूर्वी लोकांना ईडी नावाची संस्था माहितीही नव्हती. मग ती संस्था काय काम करते, ही तर फार लांबची गोष्ट, पण आता कुणाला तरी टार्गेट करायचं, कुणाला तरी त्रास द्यायचा म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, आता ही ईडी गावागावात गेलीय, अशा शब्दात पवारांनी ईडीवर आरोप केले.

प्रकरण नेमके काय आहे?

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार श्रीधर पाटणकर यांना विनातारण ३० कोटी रु.दिल्याचा ईडीचा आरोप आहे. ठाण्यातील साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्प हा पाटणकर व अन्य दोघांचा असून या प्रकल्पाला ३० कोटी रु. नंदकिशोर चतुर्वेदी यांनी दिले आहेत. हा आर्थिक व्यवहार शेल कंपन्यांच्या माध्यमातून झाल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या पैशातून पाटणकरांनी ११ फ्लॅट घेतल्याची माहिती आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0