ईडीचे गुन्हे असल्याने सिद्दिक कप्पन अजूनही तुरुंगातच

ईडीचे गुन्हे असल्याने सिद्दिक कप्पन अजूनही तुरुंगातच

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाकडून नुकताच जामीन मिळालेले केरळचे पत्रकार सिद्दिक कप्पन अद्याप तुरुंगातून बाहेर आलेले नाहीत. त्यांच्याविरोधात ईडीने गुन्

तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार यांचे जामीन अर्ज फेटाळले
गर्भवती सफूरा झरगरची अखेर जामिनावर सुटका
स्टॅन स्वामींच्या कार्याचा आदरः मुंबई हायकोर्टाकडून स्तुती

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाकडून नुकताच जामीन मिळालेले केरळचे पत्रकार सिद्दिक कप्पन अद्याप तुरुंगातून बाहेर आलेले नाहीत. त्यांच्याविरोधात ईडीने गुन्हे दाखल केल्याने त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे, त्यामुळे कप्पन यांना अजूनही लखनौतील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

कप्पन ऑक्टोबर २०२० पासून सुमारे दीड वर्षे तुरुंगात आहेत. उ. प्रदेशात हाथरस येथे एका दलित मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर त्या मुलीच्या मृत्यूची बातमी देण्यासाठी कप्पन दिल्लीहून हाथरसला जात असताना त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी वाटेतच अटक केली होती व त्यांच्यावर दंगल भडकवणे, देशद्रोह असे विविध गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर कप्पन यांचे अनेक जामीन अर्ज विविध न्यायालयांनी फेटाळले होते. अखेर गेल्या आठवड्यात कप्पन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. पण कप्पन यांची सुटका अजून रखडली आहे.

कप्पन यांच्याविरोधात ईडीचा एक खटला सुरू आहे. ईडीने त्यांना जामीन दिला तर आम्ही त्यांची सुटका करू असे लखनौचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी आशीष तिवारी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. तर कप्पन यांचे वकील हॅरिस बीरन यांनी द वायरला सांगितले की, सर्वोच्च न्यायालय व लखनौतील न्यायाधीशांनी कप्पन यांच्या जामिनाच्या शर्ती निश्चित केल्या आहेत पण त्यांच्याविरोधात पीएमएलए प्रकरण असून तेथे त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते तुरुंगातून प्रत्यक्ष बाहेर येतील.

एकूण घटनाक्रम

गेल्या आठवड्यात शुक्रवारी सरन्यायाधीश लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांनी कप्पन यांना जामीन देताना सांगितले, की कप्पन यांना तीन दिवसांत ट्रायल कोर्टात नेले जाईल आणि पहिले सहा आठवडे त्यांना नवी दिल्लीतील जंगपुरा हद्दीत राहावे लागेल. या कालावधीत कप्पन यांना प्रत्येक सोमवारी स्थानिक पोलिस ठाण्यात हजेरी नोंदवावी लागेल, त्यानंतर ते केरळला जाऊ शकतील, तेथेही त्यांना दर सोमवारी स्थानिक पोलिस ठाण्यात हजेरी द्यावी लागेल. कप्पन यांना त्यांचा पासपोर्ट तपास यंत्रणेकडे जमा करावा लागेल. याचिकाकर्त्याने त्याच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये आणि वादाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये, असे न्यायालयाने म्हटले होते.

गेल्या ऑगस्ट महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने कप्पन यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्याला कप्पन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

कप्पन हे मल्याळम न्यूज पोर्टल ‘अळीमुखम’चे वार्ताहर आणि केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टच्या दिल्ली युनिटचे सचिव आहेत. त्यांना ५ ऑक्टोबर २०२० रोजी इतर तिघांसह अटक करण्यात आली होती. उत्तर प्रदेश पोलिसांचा आरोप होता की कप्पन आपल्या अन्य साथीदारांसह हाथरसला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जात होते. त्यांचा पीएफआयशीही संबंध आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0