टेंडर टक्केवारी, पंजाबात आरोग्यमंत्र्याची हकालपट्टी

टेंडर टक्केवारी, पंजाबात आरोग्यमंत्र्याची हकालपट्टी

चंडीगढः आरोग्य खात्याच्या टेंडरमध्ये व वस्तू खरेदीमध्ये १ टक्का कमिशन घेतले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची मु

पोलिस शौर्य पदकावरचे शेख अब्दुल्लांचे नाव हटवले
एल्गार परिषदः नवलखांचा जामीन सुप्रीम कोर्टाने नाकारला
‘संविधान’ हा २०१९मधील हिंदीतील सर्वाधिक लक्षवेधी शब्द

चंडीगढः आरोग्य खात्याच्या टेंडरमध्ये व वस्तू खरेदीमध्ये १ टक्का कमिशन घेतले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी पदावरून तडकाफडकी हकालपट्टी केली. सिंगला यांच्यावर अशी कारवाई केल्यानंतर लगेचच त्यांना पंजाब पोलिस अँटिकरप्शन ब्युरोने अटक केली.

विजय सिंगला यांच्याकडे पंजाबच्या आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण व संशोधन खात्याची सूत्रे होती. ते आपल्याच खात्याच्या टेंडरमधून व वस्तूखरेदीतून १ टक्का घेतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांना मिळताच त्यांनी त्यांच्यावर कडक कारवाई केली. या संदर्भात मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, आरोग्य खात्यात सुरू असलेल्या या भ्रष्टाचाराबद्दल ना मीडियाला माहिती होती ना विरोधी पक्षांना पण मला जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्यांच्यावर कडक कारवाई केली. हे प्रकरण उघडकीस आणले नसते तर निवडून दिलेल्या लाखो पंजाबी नागरिकांचा आपण विश्वासघात केला असता. पण अशा भ्रष्टाचाराला सत्तेत स्थान देण्याची आपची भूमिका असल्याने मंत्र्यांवर कडक कारवाई करून त्यांना अटकही केली, असे भगवंत मान म्हणाले.

सिंगला यांनी आपली चूक मान्य केली असेही मान म्हणाले. आप पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करत आल्याने सत्तेत आला होता, व या राज्याचे संरक्षण करणे आपचे कर्तव्य असून राज्यातील भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्याचे आमचे प्रयत्न असतील असे मान म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0