दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

मुंबईः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी)

कोरोना निर्बंध शिथील; धार्मिक स्थळे, सिनेमागृहे बंदच
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आव्हान किती?
लखीमपुर खिरी प्रकरणातील साक्षीदारावर जीवघेणा हल्ला

मुंबईः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन  जाहीर होईल.

हा निकाल

www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
या वेबसाइटवर पाहता येईल.

www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल

गुणपडताळणी
विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत किंवा शाळांमार्फत अर्ज करायचा आहे. गुणपडताळणीसाठी सोमवार २० जून ते बुधवार २९ जूनपर्यंत अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी सोमवार २० जून ते शनिवार ९ जुलै पर्यंत अर्ज करायचा आहे. शुल्कही ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0