तामिळनाडूत चरक शपथ दिल्याप्रकरणी डीनची हकालपट्टी

तामिळनाडूत चरक शपथ दिल्याप्रकरणी डीनची हकालपट्टी

चेन्नईः तामिळनाडूतील मदुराई सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या नव्या उमेदवारांना हिप्पोक्रेटिकची शपथ देण्याऐवजी महर्षी चरक शपथ दिल्याप्रकरण

कोरोनाच्या संकटाला आपण सर्वच जबाबदारः मोहन भागवत
राज्यसभेच्या ३ जागांमुळे बदलले म. प्रदेशचे राजकारण
त्रिपुरा हिंसाचार वार्तांकनः २ पत्रकारांना जामीन

चेन्नईः तामिळनाडूतील मदुराई सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या नव्या उमेदवारांना हिप्पोक्रेटिकची शपथ देण्याऐवजी महर्षी चरक शपथ दिल्याप्रकरणी विद्यालयाचे डीन डॉ. ए. रतिनवेल यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तमिळनाडू सरकारने रविवारी या संदर्भात अधिकृत माहिती देत या घटनेची चौकशीही केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

डॉ. रतिनवेल यांनी डीन पदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांचे नाव प्रतिक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. डॉ. रतिनवेल यांनी नियमभंग केले आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हिप्पोक्रेटिकची शपथ देण्याची परंपरा व नियम आहे तो नियम तोडून महर्षी चरक शपथ देणे हा नियमभंग असल्याचे राज्याच्या आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.

डॉ. रतिनवेल यांनी राज्याच्या आरोग्य खात्याला न विचारता विद्यार्थ्यांना चरक शपथ देण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. त्यांच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांनी नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या वेबसाइटवरून चरक शपथ मिळवली. ही शपथ मूळ संस्कृत भाषेत असून तिचे रुपांतर रोमन लिपीमध्ये करण्यात आले आहे.

सध्या देशात हिंदी भाषेवरून राजकीय वातावरण तापले असताना तामिळनाडूत केंद्राच्या सांगण्यावरून अशा घटना घडत असल्याने राज्य सरकार सतर्क झाले आहे. केंद्राच्या हिंदुत्व राजकारणाचा हा भाग असल्याचे राज्य सरकारचे मत आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0