प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजना देसाई

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजना देसाई

न्यायमूर्ती (निवृत्त) चंद्रमौली कुमार प्रसाद यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पूर्ण झाल्यापासून प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) चे अध्यक्षपद रिक्त होते. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती देसाई यांनी अलीकडेच जम्मू-काश्मीर परिसीमन आयोगाचे अध्यक्षपद भूषवले होते.

सुशांत सिंग प्रकरणः सत्योत्तर काळातील मिडिया ट्रायल
जनमताची भाषा (लेखमालेतील अंतिम भाग)
टीआरपी घोटाळाः रिपब्लिक इंडियाच्या सीईओस अटक

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या (PCI) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली.

न्यायमूर्ती देसाई यांनी नुकतेच जम्मू आणि काश्मीर परिसीमन आयोगाचे अध्यक्षपद भूषवले होते, जो केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा मतदारसंघांचे सीमांकन करण्यासाठी स्थापन करण्यात आला होता.

सूत्रांनी सांगितले की उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पीसीआय सदस्य प्रकाश दुबे यांचा समावेश असलेल्या समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत न्यायमूर्ती देसाई यांच्या नियुक्तीला मान्यता दिली.

न्यायमूर्ती (निवृत्त) देसाई, ७२, यांनी महाराष्ट्र राज्याच्या सरकारी वकील आणि मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे.

माध्यमांवर देखरेख ठेवणाऱ्या या संस्थेतील इतर सदस्यांचीही लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

न्यायमूर्ती (निवृत्त) चंद्रमौली कुमार प्रसाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या नोव्हेंबरपासून अध्यक्षपद रिक्त होते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, प्रिंट मीडियाच्या विरोधात प्राप्त झालेल्या प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्याच्या आवश्यकतेशिवाय न्यायमूर्ती देसाई यांची नियुक्ती यासाठी महत्त्वाची मानली जाते कारण त्या तीन सदस्यीय शोध आणि निवड समितीच्या प्रमुख सदस्य देखील आहेत. जी समिती प्रसार भारतीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करते.

प्रसार भारतीला सध्या अध्यक्ष नाही. शेवटचे अध्यक्ष सूर्य प्रकाश यांनी राजीनामा दिला होता. सीईओ शशी शेखर यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर गेल्या आठवड्यात पद सोडले.

सरकारने डीडी न्यूजचे महासंचालक मयंक अग्रवाल यांच्याकडे सीईओचा अतिरिक्त कार्यभार दिला असून, सरकार आता शोध समितीची बैठक घेईल.

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या  अध्यक्षाव्यतिरिक्त, शोध समितीच्या इतर सदस्यांमध्ये भारताचे उपराष्ट्रपती आणि माहिती आणि प्रसारण विभागाच्या सचिवांचा समावेश आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0