राजकीय लढाई आता विधिमंडळ नियमांकडे

राजकीय लढाई आता विधिमंडळ नियमांकडे

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय लढाई आता विधिमंडळ नियमांकडे सरकली आहे. शिवसेना आणि बंडखोरांनी दोन वेगवेगळ प्रतोद नियुक्त केले असून, आमदारांचे अपहरण केल्

३४०० वर्षांपूर्वीचा राजवाडा प्रकट झाला
तुर्कस्तान-सीरियामधील बदलती सत्तासमीकरणे
४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसरा डोसला प्राधान्य

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय लढाई आता विधिमंडळ नियमांकडे सरकली आहे. शिवसेना आणि बंडखोरांनी दोन वेगवेगळ प्रतोद नियुक्त केले असून, आमदारांचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी ५ वाजता महाराष्ट्राशी सोशल मिडियावरून संवाद साधणार आहेत.

आज दुपारी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी विविध वाहिन्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आम्ही पुढची दिशा ठरवण्यासाठी संध्याकाळी एक बैठक आयोजित केली आहे. ती बैठक झाल्यावर तुम्हाला त्याचा निर्णय कळवला जाईल.”  आपल्याकडे शिवसेनेतील ३३ ते ३५ आमदार असल्याचा आणि एकूण ४६ आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.

शिवसेनेने सुनील प्रभू यांची विधिमंडळ पक्षाच्या प्रतोद पदावर नियुक्ती करून व्हीप बजावला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आणि आपलाच गट हा शिवसेना असल्याचा दावा केला आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी काल शिवसेनेचे गटनेते म्हणून अजय चोंढरी यांना मान्यता दिली होती. आता लक्ष आहे, ते विधिमंडळातील कार्यवाहीकडे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0