सत्याग्रह केल्याचे मोदींच्या दाव्याचे पुरावे पीएमओकडे नाहीत

सत्याग्रह केल्याचे मोदींच्या दाव्याचे पुरावे पीएमओकडे नाहीत

नवी दिल्लीः बांगलादेशच्या निर्मिती सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश मुक्ती संग्रामात आ

बांगलादेश-पाक मैत्री भारतासाठी त्रासदायक
‘शहांचे बांगलादेशाबद्दलचे ज्ञान मर्यादित’
भारताच्या दोन शेजाऱ्यांमधले गुफ्तगू

नवी दिल्लीः बांगलादेशच्या निर्मिती सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश मुक्ती संग्रामात आपण सत्याग्रह केला होता व त्यावेळी तुरुंगातही गेलो होतो असे आपल्या भाषणात म्हटले होते. पण मोदींच्या या दाव्याला पंतप्रधान कार्यालयाने दुजोरा दिलेला नाही. जयेश गुरुनानी यांनी दाखल केलेल्या एका माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना पंतप्रधान कार्यालयाने मोदींच्या बांगला मुक्तीसंग्रामातील सत्याग्रह वा तुरुंगवासाविषयी आमच्याकडे कोणतीही माहिती नाही, असे उत्तर दिले आहे. गुरुनानी यांनी आपला माहिती अधिकार अर्ज २७ मार्च २०२१मध्ये पंतप्रधान कार्यालयाला सादर केला होता. या अर्जात गुरुनानी यांनी मोदींच्या बांगलादेश मुक्ती संग्रामातील योगदानाविषयी माहिती मागवली होती. गुरुनानी यांनी मोदींच्या तुरुंगवासाची कागदपत्रे, त्यांच्यावर सत्याग्रह केल्या प्रकरणी दाखल केलेल्या फिर्यादीची प्रत, अटकेची कागदपत्रे, कुठल्या तुरुंगात मोदींना ठेवले आहे, तेथील पुरावे अशी माहिती मागितली होती. यावर पंतप्रधान कार्यालयाने उत्तर देताना आमच्याकडे जी माहिती आहे ती पंतप्रधानांनी (मोदींनी) केलेल्या भाषणाची असून ती पीएमओच्या वेबसाइटवर असल्याचे स्पष्ट केले.

बांग्लादेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना.

बांग्लादेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना.

पंतप्रधान कार्यालयाने गुरुनानी यांना उत्तर देताना असेही स्पष्ट केले की, मोदींविषयी जी काही माहिती आमच्याकडे आहे ती ते २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतरची आहे.

मोदींचे दावे

२६ मार्च २०२१ रोजी बांगलादेश मुक्ती संग्रामाला ५० वर्षे झाली म्हणून मोदींनी बांगलादेशची राजधानी ढाक्यापासून ३५ किमी अंतरावरील शहीद जवान स्मृती स्थळाला भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमाला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, त्यांचे मंत्रिमंडळ, लष्करातील आजी-माजी सैनिक-अधिकारी व समाजाच्या विविध थरातील अनेक माननीय व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी केलेल्या भाषणात मोदींनी बांगला देश मुक्ती संग्रामादरम्यान आपण २०-२२ वर्षांचे होतो. आणि पाकिस्तानच्या जोखडातून बांगलादेशची निर्मिती व्हावी म्हणून आपण काही सहकाऱ्यांसमवेत सत्याग्रह केला होता व तुरुंगातही गेलो होतो, असा दावा केला होता.

मोदींच्या या दाव्यावर भारतात काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी शंका उपस्थित केल्या होत्या. मोदींचे आजपर्यंतचे त्यांच्या शिक्षणापासून अनेक दावे खोटे व बनावट असल्याचे दिसून आले होते. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी मोदींच्या दाव्याचा पुरावा मागितला होता. पण त्याला मोदींनी उत्तर दिलेले नाही.

सत्याग्रह हा भारत-सोव्हिएट युनियन मैत्री कराराच्या विरोधात

द वायरने त्यावेळी मोदींच्या या दाव्याची तपासणी केली. २७ मार्च २०२१ रोजी द वायरमध्ये शुद्धब्रता सेनगुप्ता यांनी एक लेख लिहिला होता. या लेखात १ ते ११ ऑगस्ट १९७१ दरम्यान भारत-सोव्हिएट युनियन मैत्री कराराला विरोध म्हणून जनसंघाने दिल्लीमध्ये सत्याग्रह केला होता, असे म्हटले होते. भारत-सोव्हिएट युनियन मैत्री करार ९ ऑगस्ट १९७१ साली झाला होता. त्या दरम्यान हा सत्याग्रह जनसंघाकडून सुरू होता. या सत्याग्रहाच्या समारोपच्या भाषणात १२ ऑगस्ट १९७१ रोजी वाजपेयी यांनी भारत-सोव्हिएट युनियन मैत्री करार हा बांगलादेशला मान्यता मिळू नये यासाठी केला जात असल्याचा आरोप केला असल्याचे सेनगुप्ता यांचे म्हणणे आहे. सेनगुप्ता यांनी पुरावा म्हणून टाइम्स ऑफ इंडियात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचाही दिला आहे. सेनगुप्ता यांनी मोदींनीच लिहिलेल्या ‘संघर्षमा गुजरात’ या पुस्तकाचा उल्लेख करत मोदींनी आपल्या पुस्तकात बांगलादेशच्या मुक्तीसाठी सत्याग्रह केल्याचा कोठेही म्हटले नसल्याचे सांगितले आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0