उन्नावचा तपास ७ दिवसात हवा : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

उन्नावचा तपास ७ दिवसात हवा : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील उन्नाव बलात्कार खटल्यातील पाच प्रकरणे उत्तर प्रदेशातून दिल्लीकडे वर्ग करण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.

नागरिकत्वाचा मुद्दा पेटला, पुढे काय? – भाग ४
कर्नाटकात राजकीय अनिश्चितता
फडणवीसांच्या विदर्भातच जलयुक्त शिवार अपयशी!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील उन्नाव बलात्कार खटल्यातील पाच प्रकरणे उत्तर प्रदेशातून दिल्लीकडे वर्ग करण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. गुरुवारी या प्रकरणाच्या तीन सुनावण्या सर्वोच्च न्यायालयाने केल्या. यामध्ये या प्रकरणाचा संपूर्ण तपास येत्या ७ दिवसांत पूर्ण करावा व गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल करावे आणि पाच प्रकरणांची सुनावणी ४५ दिवसांत पूर्ण करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या खटल्यात रुग्णालयात असलेले पीडितांच्या नातेवाईकांना दिल्लीत उपचार हवे असतील तर त्यांना तेथे हलवता येईल अशी परवानगी देत न्यायालयाने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडित महिलेला २५ लाख रु. तर अपघातात जखमी झालेल्यांना तिच्या नातेवाईकांना २० लाख रु.ची मदत द्यावी असे आदेश उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत.

उन्नाव प्रकरणातील पीडितेला कोणतीही तक्रार करायची असेल तर ती थेट सर्वोच्च न्यायालयात करू शकते अशी मूभा तिला न्यायालयाने दिली हे. पीडितेच्या कुटुंबियांना व तिच्या वकिलांना केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षाही देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

कुलदीप सेंगरची भाजपमधून हकालपट्टी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही मिनिटांत भाजपने आपले आमदार व उन्नाव बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी कुलदीप सेंगरची पक्षातून कायमची हकालपट्‌टी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0