नवी दिल्ली : देशातले सर्व कायदे नियम फक्त हिंदूंनाच लावले पाहिजेत का, असा सवाल करत भाजपच्या भोपाळमधील खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी न्यायालयाच्या आद
नवी दिल्ली : देशातले सर्व कायदे नियम फक्त हिंदूंनाच लावले पाहिजेत का, असा सवाल करत भाजपच्या भोपाळमधील खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत लोकांनी दणक्यात डीजे, लाउडस्पीकर लावून नवरात्री साजरी करावी असे वक्तव्य केले. नवरात्रीनिमित्त त्या भोपाळ येथे आल्या असता त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.
मोठ्या आवाजातल्या डीजे व लाउडस्पीकरला न्यायालयाने परवानगी नाकारली असल्याचे प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या लक्षात आणून देता त्यांनी मला न्यायालयाचा हा निर्णय अजिबात मंजूर नाही. देशातले कायदेनियम फक्त हिंदूंनीच पाळावेत का असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांना केला.
मूळ बातमी
COMMENTS