मुंबई : अवसायनात गेलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतून (पीएमसी) १० हजार रु.पर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने गुरुवारी खाते
मुंबई : अवसायनात गेलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतून (पीएमसी) १० हजार रु.पर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने गुरुवारी खातेदारांना दिली. या निर्णयाने पीएमसी बँकेच्या सुमारे ६० टक्के खातेदारांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. १० हजार रु.ची रक्कम सहा महिन्यातून एकदाच काढता येणार आहे. ही रक्कम खातेदार एटीएम किंवा ऑनलाइन बँकिंगद्वारे काढू शकतो.
मंगळवारी रिझर्व्ह बँकेने पीएमसीतून सहा महिन्यांपर्यंत केवळ एक हजार रु.पर्यंत रक्कम काढण्यास परवानगी दिल्यानंतर हजारो खातेदारांमध्ये संताप व अस्वस्थता पसरली होती. गुरुवारी शीवमध्ये काही खातेदारांनी बँकेचे मुख्य संचालक व अन्य बँक अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांमध्ये सामूहीक फिर्याद नोंदवली.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही बँकेच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
मूळ बातमी
COMMENTS