‘नवा’च्या नमुन्यामागे दडवलेले सत्य

‘नवा’च्या नमुन्यामागे दडवलेले सत्य

नवी दिल्ली : राष्ट्रव्यापी लॉकडाउनच्या ९व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांकडे कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी त्यांचा ९ मिनि

मोदींचे उथळ भाषण व जमिनीवरील वास्तव
संगणकाचे भाऊबंद – २
अग्रिमा जोशुआच्या ट्रोलिंगमध्ये वाढ

नवी दिल्ली : राष्ट्रव्यापी लॉकडाउनच्या ९व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांकडे कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी त्यांचा ९ मिनिटांचा वेळ मागितला. ५ एप्रिल रोजी (लक्षात घ्या, ५/४ रोजी म्हणजे ५+४ पुन्हा ९च की) रात्री ९ वाजता देशवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ काढायचा आहे.

या परिच्छेदात कितीतरी वेळा ९ आकडा आला आहे ना, हाही योगायोगच.

या ९ मिनिटांत सर्व भारतीयांना आपल्या घरातील विजेचे दिवे मालवून तेलाचे दिवे, टॉर्च किंवा फोन्सचे फ्लॅशलाइट्स लावायचे आहेत.  “५ एप्रिल रोजी, रात्री ९ वाजता तुमच्या घरातील सगळे विजेचे दिवे मालवा आणि दारांत किंवा बाल्कनींमध्ये मेणबत्त्या, पणत्या, टॉर्च किंवा मोबाइल फ्लॅशलाइट्स घेऊन ९ मिनिटे उभे राहा. मी पुन्हा सांगतो, मेणबत्त्या, पणत्या, टॉर्च किंवा मोबाइल फ्लॅशलाइट्स,” असे पंतप्रधान म्हणाले.

असे केल्यास लोकांना ते एकटे नाहीत हे पुन्हा एकदा जाणवेल, असेही मोदी म्हणाले. मात्र इटलीतील लोकांनीही लॉकडाउनमध्ये जाणवणारी एकाकीपणाची भावना दूर करण्यासाठी मेणबत्त्या धरल्या होत्या असे ते म्हणाले नाहीत. पण ९ वाजताच आणि ९ मिनिटेच का? एका सिद्धांतानुसार, ९ दिवस चालणारा चैत्र नवरात्रोत्सव नुकताच संपला आहे. हिंदू पुराणाच्या अनेक परंपरांमध्ये ९ हा अंक विशेष शुभ समजला जातो.

२२ मार्च रोजी जनता कर्फ्यूदरम्यान लोकांनी घराबाहेर पडून थाळ्या वाजवल्या, त्याची पुनरावृत्ती यावेळी करू नका, हे सांगण्याची काळजी मोदी यांनी घेतली. डॉक्टर्सना पुरेशा सोयींच्या अभावी त्यांची आयुष्ये धोक्यात घालावी लागत आहेत ही तक्रार गेल्या काही आठवड्यांत वारंवार केली जात आहे. त्याचप्रमाणे आरोग्यसेवकही विषाणूच्या संपर्काबाबत चिंताग्रस्त आहेत. यावर मोदी यांनी काहीच भाष्य केले नाही, अशी टीका होत आहे.

वकील वृंदा ग्रोवर यांनीही मोदी यांच्यावर त्यांच्या प्राधान्यक्रमांबद्दल टीकास्त्र सोडले. “मी भारत प्रजासत्ताकाची नागरिक आहे, कोणा रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर नाचणारी विदूषक नाही,” अशा शब्दांत त्यांनी मोदी यांच्या आवाहनाचा समाचार घेतला आहे.  खरा प्रश्न भारत कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी किती सज्ज आहे हा आहे आणि अशा नाटकांच्या आडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे त्या म्हणाल्या.

“डॉक्टरांसाठी पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स) किती उपलब्ध आहेत याबद्दल मला माहिती हवी आहे. किती रुग्णालये, किती व्हेंटिलेटर्स, किती आयसीयू सज्ज आहे याबद्दल मला माहिती हवी आहे. कोविड-१९ चाचण्यांची सुविधा उपलब्ध व परवडण्याजोगी करून दिली जाणार आहे की नाही याबद्दल मला माहिती हवी आहे. रोजंदारीवरील कामगार, बेघर, बेरोजगार यांच्या पोटापाण्यासाठी सरकारने काय व्यवस्था केली आहे याची माहिती मला हवी आहे. स्थलांतरित मजुरांच्या अन्नाच्या व वैद्यकीय गरजांची पूर्तता कोण व कशी करत आहे याबद्दल मला माहिती हवी आहे. शेतकऱ्यांना या संकटाचा सामना करण्यासाठी काय मदत केली जात आहे याबद्दल मला माहिती हवी आहे. स्वत:च्या घरात अडकलेल्या स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचार टाळण्यासाठी काय मदत केली जात आहे याची माहिती मला हवी आहे. या लॉकडाउनच्या काळात उपजीविका चालवण्यासाठी तृतीयपंथी आणि देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांना काय मदत केली जात आहे याची माहिती मला हवी आहे,” अशी विचारणा ग्रोवर यांनी केली.

जी उत्तरे जनतेला मिळायला हवीत ती मिळत नाहीत हे मोदी यांच्या तिसऱ्या भाषणातून दिसून आले आहे. पंतप्रधानांनी नागरिकांकडे ९ मिनिटे मागितली आहेत खरी, पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ते नेमकी कधी देणार हा खरा प्रश्न आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0