लॉकडाऊनमुळे गंगा, यमुना स्वच्छ होतेय

लॉकडाऊनमुळे गंगा, यमुना स्वच्छ होतेय

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन पुकारल्याने गंगा नदीच्या प्रवाहात प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. गंगा नदी

आसामात ‘एनआरसी’, केरळात ‘न्याय’!
फटाक्यांचा धुरच धूर.. नियमांचा चक्काचूर
विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्व नागालँडला वेगळे राज्य करण्याची मागणी

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन पुकारल्याने गंगा नदीच्या प्रवाहात प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. गंगा नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कचरा, सांडपाणी टाकले जाते शिवाय नदीत अनेक धार्मिक स्थळांवरून निर्माल्य टाकले जाते. आता सामाजिक अंतर ठेवण्याचे आदेश आल्यानंतर व लॉकडाऊनमध्ये सर्वच कारखाने बंद असल्याने प्रदूषणाची पातळी खालावली आहे, अशी माहिती काही पर्यावरण तज्ज्ञांनी दिली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आंघोळीस योग्य असे गंगा नदीच्या पाण्याचे प्रमाणीकरण केले आहे. त्यानुसार सध्याच्या घडीला हे पाणी आंघोळीस  योग्य ठरू शकते असे पर्यावरण तज्ज्ञ म्हणत आहेत.

पण पर्यावरण तज्ज्ञांच्या मताला पूरक अशी माहिती मात्र अद्याप केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेली नाही.

उ. भारतात वाहणार्या गंगा नदीचे प्रदूषण ३६ ठिकाणी मोजले जाते. या ३६ ठिकाणांपैकी २७ ठिकाणचे पाणी आंघोळीस योग्य व वन्यजीव-मत्स्यपालनास अनुकूल झाले असे पर्यावरण तज्ज्ञ मनोज मिश्रा यांचे मत आहे. गंगा नदी उत्तराखंडमधून निघून उ. प्रदेशात प्रवेश करते. तेथून प. बंगाल उपसागरात जाईपर्यंत संपूर्ण नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात सांडपाणी, कारखानदारी, प्रचंड लोकसंख्या, निर्माल्यामुळे प्रदूषित होत असते. आता औद्योगिक पट्ट्यातून सांडपाणी कमी झाल्याने तिचे पाणी स्वच्छ दिसू लागले आहे. या पाण्याची तपासणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामी येईल, असे मनोज मिश्रा यांचे मत आहे.

आणखी एक पर्यावरण तज्ज्ञ विक्रांत तोंगड यांच्या मते कानपूर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात औद्योगिक सांडपाणी, कचरा नदीत सोडला जातो. सध्या लॉकडाऊन असल्याने कानपूरमधून होणारे प्रदूषण रोखले गेले आहे. केवळ गंगा नदीच नव्हे तर गंगेच्या उपनद्या हिंडन व यमुनेच्या पाण्याचीही गुणवत्ता वाढली आहे. जेवढा लॉकडाउनचा काळ वाढेल तेवढे पाण्याची गुणवत्ता सुधरत जाणार आहे.

साउथ एशिया नेटवर्क ऑफ डॅम्स, रिव्हर्स, पीपल्सचे समन्वयक भीम सिंह यांनीही मथुरानजीक वाहणार्या गंगेच्या पाण्यात सुधारणा झाल्याचे म्हटले आहे. नद्या स्वत:हून आपल्या पाण्यात सुधारणा करत असतात पण रासायनिक सांडपाण्याचे वाढते प्रमाण नदीची ही क्षमता मारत असतो. आता परिस्थिती पुन्हा बदलेल असे ते म्हणतात.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0