अदानी समुहाकडून राज्यात ११ हजार मेगावॅट वीज निर्मिती

अदानी समुहाकडून राज्यात ११ हजार मेगावॅट वीज निर्मिती

मुंबई: येत्या ५ वर्षात राज्यात अदानी उद्योग समुहातर्फे ११ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. मंगळवारी राज्य सरकारचा ऊर्जा विभाग आणि अदानी ग्रीन ए

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकाची भ्रष्टाचारप्रकरणी हकालपट्टी
डोवाल : अधिकार नसून वाटाघाटी केल्या
टूलकिट प्रकरणः दिशा रवी यांना अटक

मुंबई: येत्या ५ वर्षात राज्यात अदानी उद्योग समुहातर्फे ११ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. मंगळवारी राज्य सरकारचा ऊर्जा विभाग आणि अदानी ग्रीन एनर्जी समूह (एजीईएल) यांच्यात करार झाला. या करारात ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण असा सामंजस्य करार करण्यात आला.

या करारानुसार अदानी ग्रीन एनर्जी कंपनीतर्फे राज्यात पम्पड स्टोरेज प्रोजेक्टस (पीएसपी – Pumped Storage Projects) उभारले जाणार आहेत. आगामी चार ते पाच वर्षात अदानी समुह सुमारे ६० हजार कोटी रु.ची गुंतवणूक या प्रकल्पांमध्ये करणार आहे. यामुळे ३० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच या पीएसपींच्या माध्यमातून ११ हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या मदतीने वीज निर्मिती वा वीज संचय करणाऱ्या या प्रकल्पांचे लाभ राज्याला होतील विशेषतः वीज टंचाईच्या स्थितीत तत्काळ वीज निर्मितीसाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांचे म्हणणे आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0