काबूलमध्ये अडकलेले १७० भारतीय मायदेशी परत

काबूलमध्ये अडकलेले १७० भारतीय मायदेशी परत

काबूलः तालिबान बंडखोरांच्या ताब्यात काबूल आल्यानंतर अफगाणिस्तानात अडकलेले १७०हून अधिक भारतीय नागरिकांना मंगळवारी दुपारी एअर इंडियाच्या विशेष विमानातून

अफगाणिस्तान : जी ७ देशांची तातडीची बैठक
महिलांना संपूर्णपणे झाकून घेण्याचा तालिबानचा आदेश
भूमी कोणालाही वापरू देणार नाहीः तालिबान

काबूलः तालिबान बंडखोरांच्या ताब्यात काबूल आल्यानंतर अफगाणिस्तानात अडकलेले १७०हून अधिक भारतीय नागरिकांना मंगळवारी दुपारी एअर इंडियाच्या विशेष विमानातून भारतात सुखरूपपणे आणण्यात आले. यांमध्ये काबूलमधील भारतीय राजदूत रुद्रेंद्र टंडन यांचाही समावेश आहे.

रविवारी तालिबान बंडखोरांनी काबूल ताब्यात घेतल्यानंतर काबूल विमानतळावर पलायन करणार्यांची झुंबड उडाली होती. त्यामुळे तेथील विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यात एअर इंडियाचे एक उड्डाणही या गोंधळामुळे रद्द करण्यात आले होते. मंगळवारी मात्र एअऱ इंडियाचे विमान काबूलहून १७०हून अधिक भारतीय नागरिकांना घेऊन दिल्लीकडे निघाले. पण वाटेत इंधन भरण्यासाठी विमान गुजरातमधील जामनगर विमानतळावर उतरवण्यात आले होते. विमानतळावर जामनगरचे जिल्हाधिकारी सौरभ पारधी उपस्थित होते.

गेल्या तीन दिवसांत २००हून अधिक भारतीय नागरिक व अफगाण मिशनमध्ये कार्यरत असणार्या कर्मचार्यांना काबूलहून भारतात आणले गेल्याची माहिती रुंद्रेद्र टंडन यांनी दिली.  अफगाणिस्तानातील परिस्थिती अस्थिर आहे, आम्ही भारतात सुखरूप आलो. येथे सुरक्षित वाटू लागले आहे. कोणतीही दुर्दैवी घटना आमच्याबाबतीत घडली नाही अशी प्रतिक्रिया टंडन यांनी दिली. अफगाणिस्तानात अद्याप मोजकेच भारतीय नागरिक असून त्यांना लवकरच मायदेशी आणण्यात येणार आहे, असेही टंडन म्हणाले.

(मूळ वृत्त ‘अल-जझिरा’ वाहिनीवर प्रसिद्ध झाले आहे. )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0