‘काश्मीर प्रश्न भारताचा अंतर्गत प्रश्न, आम्ही हस्तक्षेपाच्या विरोधात’

‘काश्मीर प्रश्न भारताचा अंतर्गत प्रश्न, आम्ही हस्तक्षेपाच्या विरोधात’

श्रीनगर : जम्मू व काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या युरोपियन युनियनच्या संसद सदस्यांनी बुधवारी आमच्या दौऱ्याचा उद्देश काश्मीर प्रश्नात दखल व

काश्मीरात किती दिवस निर्बंध राहणार? : सर्वोच्च न्यायालय
काश्मीरमधील परिस्थिती : अमित शहांच्या गृहमंत्रालयाकडे माहिती नाही
अमित शहांच्या मतदारसंघात ‘कलम ३७०’ क्रिकेट स्पर्धा

श्रीनगर : जम्मू व काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या युरोपियन युनियनच्या संसद सदस्यांनी बुधवारी आमच्या दौऱ्याचा उद्देश काश्मीर प्रश्नात दखल वा हस्तक्षेप करण्याचा नसून हा प्रश्न भारताचा अंतर्गत मामला असल्याचे प्रसारमाध्यमांपुढे स्पष्ट केले. बुधवारी हा दोन दिवसांचा दौरा संपल्यानंतर या २३ संसद सदस्यांनी मीडियाशी संवाद साधताना आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात आपण उभे आहोत असे स्पष्ट केले.

फ्रान्सचे सदस्य हेन्री मेलोसे यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा आमच्या दृष्टीने चिंतेचा विषय असून सर्व जगाला भेडसावणारी ही समस्या आहे असे स्पष्ट करत कालच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सहा मजुरांची हत्या केली, हे मजूर निष्पाप नागरिक होते त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत असे सांगितले. काश्मीरमधील दहशतवादाबद्दल भारतीय लष्कर व पोलिसांशी चर्चा झाली. या यंत्रणांनी पाकिस्तानमधून दहशतवादाला कशी फूस दिले जाते व प्रशिक्षण दिले जाते याची आम्हाला माहिती दिली. काश्मीर अशा हिंसाचारामुळे मागे आहे, आम्हाला लोकांनी परिस्थिती बदलायला हवी असे सांगितले, त्यावरून येथे शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे असे मत बनल्याचे मेलोसे यांनी सांगितले.

ब्रिटनचे खासदार न्यूटन डन यांनी, आमचे डोळे उघडणारा हा दौरा होता अशी प्रतिक्रिया दिली. आमच्या युरोपमध्ये अनेक वर्षानंतर शांतता प्रस्थापित झालेली आहे. आम्हाला भारत हा शांततापूर्ण देश हवा आहे आणि त्यासाठी सर्वांना आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात लढावे लागेल, असे ते म्हणाले.

पोलंडचे सदस्य रेजार्ड जार्नेकी यांनी परदेशी प्रसारमाध्यमातून काश्मीरची प्रतिमा पक्षपाती रंगवली जात होती. आम्ही आमच्या देशात जाऊन सत्य परिस्थिती लोकांपुढे ठेवणार आहोत, असे सांगितले.

फ्रान्सचे खासदार थेअरी मारियानी म्हणाले, मी यापूर्वी भारतात अनेकवेळा आलो आहोत. हा दौरा काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी नव्हता तर काश्मीरमधील वास्तव परिस्थिती जाणण्यासाठी होता. दहशतवाद एखाद्या देशाला उध्वस्त करू शकतो. अफगाणिस्तान, सीरिया या देशांत मी जाऊन आलोय. त्या देशाची परिस्थिती मी पाहिली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात लढाई करण्यासाठी भारतासोबत आम्ही आहोत असे मरियानी म्हणाले.

मरियानी यांनी त्यांच्यावर नाझीवादी असल्याचा आरोप केल्याबद्दलही चिंता व्यक्त केली. असे आरोप करण्याअगोदर माझी माहिती घेतली असती तर बरे झाले असते असे ते म्हणाले.

दरम्यान, २३ खासदारांचे शिष्टमंडळ काश्मीर दौऱ्यावर आल्याची बातमी खोऱ्यात वाऱ्यासारखी पसरल्याने या शिष्टमंडळाच्या विरोधात अनेक ठिकाणी तीव्र निदर्शने झाली. श्रीनगर व खोऱ्यातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.

काँग्रेसची दौऱ्यावर टीका, मोदी सरकारची मोठी चूक, संसदेचा अवमान

युरोपियन युनियनच्या २३ सदस्यांना काश्मीरची परिस्थिती दाखवण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीवर काँग्रेसने तीव्र शब्दांत टीका केली आहे. मोदी सरकारने हा निर्णय घेऊन मोठी चूक केली असून काश्मीर हा भारताचा अंतर्गत मामला आहे या भारतीय परराष्ट्र धोरणाला या सरकारने कमकुवत केले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी केला.

गेली ७२ वर्षे काश्मीर प्रश्न हा अंतर्गत मामला असल्याचे भारताचे परराष्ट्रधोरण होते. या धोरणात कोणत्याही तिसऱ्या शक्तीचा हात असू नये याची खबरदारी पूर्वीची सरकारे घेत होती पण मोदी सरकारने ईयूच्या सदस्यांना भेटीची परवानगी देऊन या धोरणाला हरताळ फासला असून या दौऱ्याची आखणी करणाऱ्या मादी शर्मा कोण, असा सवाल काँग्रेसने केला आहे. या मादी शर्मा यांचे भाजपशी कसले संबंध आहे, त्यांची कोणी व कोणत्या पातळीवर मोदींशी भेट घालून दिली आणि सरकार या दौऱ्याबद्दल इतके आग्रही का आहे असे अनेक प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले. असे दौरे आखून परराष्ट्रखात्याला बाजूला ठेवले का असाही मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0